सागरीका घाटगेचा मराठमोळा 'डाव'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 11:01 AM2017-08-10T11:01:57+5:302017-08-10T17:56:36+5:30
'चक दे' गर्ल या सिनेमातून हिंदीत चमकलेली सागरीका घाटगे पुन्हा एकदा मराठी सिनेमात झळकणार आहे त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला ...
' ;चक दे' गर्ल या सिनेमातून हिंदीत चमकलेली सागरीका घाटगे पुन्हा एकदा मराठी सिनेमात झळकणार आहे त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.यापूर्वी सतीश राजवाडे दिग्दर्शित प्रेमाची गोष्ट सिनेमात सागरिका घाटगे झळकली होती.या सिनेमात सागरिका घाटगेसह पहिल्यांदाच अतुल कुलकर्णी रोमँटिक भूमिकेत झळकला होता.सागरिका घाटगे आणि अतुल कुलकर्णी यांची 'प्रेमाची गोष्ट' रसिकांना चांगलीच भावली होती.आता पुन्हा एकदा रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी 'डाव' या आगामी सिनेमाव्दारे मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे.‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटानंतर 'डाव' हा सागरीकाचा दुसरा मराठी चित्रपट आहे.नितीन उपाध्याय यांनी ऑडबॉल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली डावची निर्मिती केली असून, कनिष्क वर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या सस्पेंस-थ्रीलरपटाची कथा-पटकथा कनिष्क वर्मा यांनीच लिहिली आहे.संवाद योगेश मार्कंडे यांनी लिहिले आहेत तर मंगेश धाकडे यांचे पार्श्वसंगीत या चित्रपटाला लाभले आहे.मराठी चित्रपट रसिकांना सायको किलिंगचा अनुभव देणाऱ्या डावमध्ये सागरीकाने मुख्य भूमिका साकारली असून, आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा या चित्रपटातील भूमिका खूपच वेगळी आहे. इतर जॉनरच्या चित्रपटांच्या तुलनेत मराठीमध्ये थ्रीलरपटांची संख्या फार कमी असून,'डाव' हा चित्रपट त्यांची उणीव नक्की भरून काढणारा असेल असे सागरिकाने सांगितले.आशयघन कथानक, अर्थपूर्ण संवादलेखन,सहजसुंदर अभिनय, प्रसंगानुरूप पार्श्वसंगीत आणि त्याला साजेसं सादरीकरण या सर्वांचा मिलाफ घडवणारा डाव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सागरिका तिच्या सिनेमांपेक्षा झहीरसह असलेल्या अफेअरमुळे चर्चेत होती.सागरिका आणि झहीरची ओळख त्याच्या एका कॉमन फ्रेंडने करुन दिली होती. दोघे एकमेकांना जवळपास एक दीड वर्ष डेट करत होते.तसेच काही दिवसांपूर्वीच दोघांचा साखरपुडा झाल्याची माहिती खुद्द झहीरने ट्विटरवरुन दिली होती.''बायकोच्या चॉईसवर कधीही हसू नका.तुम्हीही तिचीच चॉईस असता.पार्टनरर्स फॉर लाईफ असे त्यांनी ट्वीट केले होते.''ट्वीटसोबत झहीरने साखरपुड्याचा एक फोटोसुद्धा शेअर केला होता.