या मराठी अभिनेत्याने केली ब्रेन ट्युमरवर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 02:27 PM2019-08-29T14:27:54+5:302019-08-29T14:30:42+5:30

या अभिनेत्याला ब्रेन ट्युमर झाला असल्याचे त्याला काही महिन्यांपूर्वी कळले. ही बातमी ऐकून त्याला चांगलाच धक्का बसला होता.

Sai Gundewar Battle with brain cancer | या मराठी अभिनेत्याने केली ब्रेन ट्युमरवर मात

या मराठी अभिनेत्याने केली ब्रेन ट्युमरवर मात

googlenewsNext
ठळक मुद्देसाईला हॉलिवूडमधील काही प्रोजेक्टसाठी विचारण्यात आले होते. तो त्याची तयारीच करत असताना त्याची तब्येत अचानक बिघडली.

साई गुंडेवार हा एक अभिनेता, मॉडेल आणि वॉईज ओव्हर आर्टिस्ट असून त्याने एमटिव्ही स्पलिट्सव्हिला या कार्यक्रमात भाग घेतला होता. याच कार्यक्रमामुळे त्याला खऱ्या अ4थाने लोकप्रियता मिळाली. यामुळेच त्याला स्टार प्लसच्या सर्व्हायव्हर या कार्यक्रमात देखील झळकण्याची संधी मिळाली होती. त्याने डेव्हिड, आय मी और हम, बाजार, पीके, युवराज यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. 'डॉट कॉम मॉम' या मराठी चित्रपटात त्याने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तसेच अनेक जाहिरातींमध्ये देखील तो झळकला आहे. तो एक अभिनेता असण्यासोबतच एक प्रसिद्ध व्यवसायिक देखील आहे. फूडिझम या जेवण पोहचवण्याचे काम करणाऱ्या कंपनीचा तो को-फाऊंडर आहे. 

साईला ब्रेन ट्युमर झाला असल्याचे त्याला काही महिन्यांपूर्वी कळले. त्यावेळी ही बातमी ऐकून त्याला चांगलाच धक्का बसला होता. गेल्या सहा महिन्यांपासून तो या आजारावर उपचार घेत आहे. तो सध्या लॉस एंजेलिसमध्ये असून 'ब्रेन कॅन्सर' सोबत लढतोय. मार्च महिन्यात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर विविध चाचण्या देखील करण्यात आल्या आहेत. कॅन्सर या आजारावर तो यशस्वीपणे लढाई देत असून पत्नीच्या आणि कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळेच मी आजारापणावर मात देऊ शकलो असे त्याचे म्हणणे आहे. 

साईला हॉलिवूडमधील काही प्रोजेक्टसाठी विचारण्यात आले होते. तो त्याची तयारीच करत असताना त्याची तब्येत अचानक बिघडली. याचमुळे तो डॉक्टरांकडे गेला. त्यावेळी त्याला ब्रेन कॅन्सर असल्याची शक्यता डॉक्टरांना वाटत असल्याने त्याला न्युरोसर्जनकडे पाठवण्यात आले. तिथे करण्यात आलेल्या चाचण्यांमधून त्याला ट्युमर असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

केवळ एका क्षणात त्याचे आयुष्य बदलून गेले. पण तुझे वय कमी असल्याने तू लवकर बरा होशील असा डॉक्टरांनी त्याला धीर दिला होता. हे सगळे त्याला कळले त्याचनंतर काहीच दिवसांत तो स्वॉटच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार होता. त्याने त्या अवस्थेत देखील चित्रीकरण केले. या आजारातून त्याने आता मात केली असून तो लवकरात लवकर संपूर्णपणे बरा होवो येवढीच त्याच्या फॅन्सची इच्छा आहे.  

Web Title: Sai Gundewar Battle with brain cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.