/> दोन अभिनेत्री एकत्र आल्या कि त्यांच पटत नाही. सेटवर भांडणे होतात, मग त्यांच्यातील कोल्ड वॉरची जोरदार चर्चा रंगु लागते अन मग काय बघता भघता या देघी एकमेकींच्या कशा कट्टर दुश्मन आहेत अशा बातम्या सगळीकडेच पसरु लागतात. बºयाचजणांना असे वाटते की हिरोईन्समध्ये मैत्री पेक्षा कॅटफाईटच जास्त असते. अन दोन हिरोईन्स कधीच एकमेकींच्या क्लोज फ्रेन्ड्स होऊ शकत नाहीत. परंतू आता ही असली समीकरणे बदलली असुन आपण बॉलीवुडच्या काही हिराईन्सची जवळीक तर पाहिलीच आहे. मग आपल्या मराठी तारका तरी कशा मागे असतील बरं. मराठी इंडस्ट्रीची बोल्ड अॅन्ड ब्युटिफुल अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. अगदी सोज्वळ भुमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. या दोघींचा दोस्ताना सध्या सोशल साईट्सवर चांगलाच फुलताना दिसत आहे. त्याचे झाले असे की मुक्ताच्या वाढदिवसाला सईने आपल्या या लाडक्या मैत्रिणीला खुप साºया शुभेच्छ्या तर दिल्याच पण यु आर माय इन्स्पिरेशन असे देखील म्हटले आहे. एखादी अभिनेत्री दुसºया अभिनेत्रीची अशी जाहिररित्या स्तुती करते अन तु माझी प्रेरणा आहेस असे सांगते म्हणटल्यावर या मैत्री विषयी आपण न बोललेलच बर. या दोघींचा हा दोस्ताना असाच बहरत जावो असे यांच्या चाहत्यांना नक्कीच वाटत असेल.
{{{{twitter_post_id####}}}}
Web Title: Sai-Mukta Friendly
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.