सई ताम्हणकर उचलतेय एक धाडसी पाऊल, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 10:18 AM2019-09-30T10:18:25+5:302019-09-30T10:22:58+5:30
चित्रपटांची पन्नाशी गाठणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे नेहमीच आजपासच्या गोष्टींमधून वेगळा दृष्टिकोन मांडणारा सिनेमा मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत.
आपल्या सर्वांच्या आयुष्यात ‘नाती’ या शब्दाला खूप वजन आहे आणि त्याहून जास्त वजनदार आहे ते म्हणजे नाती सांभाळण्याची जबाबदारी. पण नाती खरंच तितकी महत्त्वाची असतात? प्रत्येक नात्याची जबाबदारी सांभाळणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं का? आयुष्याच्या वळणावर येणा-या वेगळ्या नात्यांचा प्रवास उलगडवणारा ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ हा मराठी चित्रपट यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ मधून एक धाडसी पाऊल उचलतेय सई ताम्हणकर येत्या २२ नोव्हेंबरला.
तिला आख्खं आयुष्य बदलून टाकायचं होतं. तिने पेहराव बदलला, तिने घर बदललं, तिने नोकरी बदलली, तिने ऍटिट्युड बदलला, तिने नवरा बदलला, तिने मित्र बदलला, तिने तिचं जगणं बदललं पण तिचं जगणं बदललं का? भूमिका बदलत गेलेल्या भूमिकामागची भूमिका करणारी सई ताम्हणकर येतेय तुमच्या भेटीला. चित्रपटांची पन्नाशी गाठणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे नेहमीच आजपासच्या गोष्टींमधून वेगळा दृष्टिकोन मांडणारा सिनेमा मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. मध्यमवर्गीय बंडखोर बाईची एक बंडखोर गोष्ट ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ मधून अनुभवयाला मिळेल.
नुकतेच या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे आणि पोस्टरमध्ये दाखवल्यानुसार सई ताम्हणकर मुलगी, पत्नी, आई आणि प्रेयसी या अनेक नात्यांमध्ये दिसणार आहे. स्मिता फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत आणि गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ चित्रपटाची निर्मिती स्मिता विनय गानू यांनी केली आहे तर सहनिर्मिती अजित पोतदार आणि सीमा अलापे यांनी केली आहे. झपाट्याने बदलणा-या आजच्या काळात नात्यांचा अक्षांश रेखांशला छेद देणारा .‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ चित्रपट २२ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.