"राया करा एक इशारा, आलेच मी..!" सई ताम्हणकरची शानदार लावणी, 'देवमाणूस'मधलं गाणं रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 15:19 IST2025-04-15T15:19:03+5:302025-04-15T15:19:49+5:30

सई ताम्हणकर लावणीवर जबरदस्त नजाकत. अभिनेत्रीचं लावणीनृत्य पाहण्यासाठी बातमीवर क्लिक करा (sai tamhankar)

Sai Tamhankar dances on Lavani for the first time aalech me song from Devmanus | "राया करा एक इशारा, आलेच मी..!" सई ताम्हणकरची शानदार लावणी, 'देवमाणूस'मधलं गाणं रिलीज

"राया करा एक इशारा, आलेच मी..!" सई ताम्हणकरची शानदार लावणी, 'देवमाणूस'मधलं गाणं रिलीज

सई ताम्हणकरला (sai tamhankar) आपण विविध भूमिकांमध्ये आजवर पाहिलंय. कधी बोल्ड भूमिकेतून सईने सर्वांना थक्क केलं. तर कधी भावुक भूमिका साकारुन सईने सगळ्यांना रडवलं. आता सगळ्यांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या आजवरच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच लावणीवर थिरकणार आहे. आगामी 'देवमाणूस' या (devmanus movie) बहुप्रतिक्षित चित्रपटात 'आलेच मी' म्हणत पहिल्यांदाच सई शानदार लावणीवर थिरकणार आहे. 'देवमाणूस' सिनेमातील ही लावणी नुकतीच रिलीज झाली आहे.

सई ताम्हणकरची जबरदस्त लावणी

'देवमाणूस' सिनेमात लावणीवर थिरकण्यासाठी सईने तब्बल ३३ तासांपेक्षा अधिक वेळ रिहर्सल केली. लावणीच्या प्रत्येक नजाकतीत ती पूर्णपणे रमली आणि एक धमाकेदार परफॉर्मन्स तिने सादर केला आहे. आपल्या अनुभवाबद्दल सई म्हणते, “'देवमाणूस'मध्ये लावणी करणे हा एक विलक्षण अनुभव होता. हा माझा एक नवीन प्रयत्न होता आणि मला खूप मजा आली. गाणे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन हलली. लव फिल्म्स आणि तेजस यांनी मला या भूमिकेसाठी निवडले, याबद्दल मी खूप आभारी आहे. आशीषच्या मार्गदर्शनाशिवाय इतकी प्रभावी लावणी साकारता आलीच नसती. प्रेक्षकांना माझे हे नवे रूप आवडेल, अशी आशा आहे!”

कधी रिलीज होणार 'देवमाणूस' सिनेमा?

विविधांगी भूमिका साकारून आपली छाप पाडणारी सई, 'आलेच मी' या गाण्यातून एका वेगळ्याच अविष्कारात प्रेक्षकांसमोर येत आहे. पारंपरिक मराठी संगीतसृष्टीत आपली खास ओळख असणाऱ्या बेला शेंडे यांच्या दमदार आवाजात हे लावणी गीत साकारण्यात आले असून रोहन प्रधान यांनी त्यांना साथ दिली आहे. रोहन-रोहन यांचे संगीत लाभलेले हे गाणे तेजस देऊस्कर यांनी लिहिले असून रोहन गोखले यांनीही अतिरिक्त गीतलेखन केले आहे.

सुप्रसिद्ध लावणी तज्ज्ञ आशीष पाटील यांनी या गाण्याची नृत्यरचना केली आहे. 'आलेच मी' हे गाणे त्याच्या भन्नाट बीट्स, आकर्षक सादरीकरण आणि सईच्या जबरदस्त उपस्थितीमुळे लवकरच टॉप लिस्टमध्ये झळकण्यास सज्ज आहे. लव फिल्म्स प्रस्तुत, तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन व अंकुर गर्ग निर्मित देवमाणूस २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Sai Tamhankar dances on Lavani for the first time aalech me song from Devmanus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.