Sai Tamhankar : सई ताम्हणकरला येईना 3 चा पाढा, म्हणता म्हणता आले नाकी नऊ! मजेशीर व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 10:12 AM2024-07-14T10:12:42+5:302024-07-14T10:16:47+5:30
मराठामोळी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या फार चर्चेत आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि तितकंच नावाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री सई ताम्हणकर. गुणी अभिनेत्री म्हणून सिनेसृष्टीत सई ताम्हणकरकडे बघितले जाते. सांगलीत लहानाची मोठी झालेली, अस्सल मराठमोळी सई हटके भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येत असते. विविध भूमिकांमधून चमक दाखवणारी सई ही बोल्ड आणि बिनधास्त असल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. मराठामोळी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या फार चर्चेत आहे. सईचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सईनं झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'बस बाई बस'मध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील सईचा जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून या व्हिडीओनं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. यामध्ये गणितासंर्भातीलही प्रश्न विचारल्यावर सई गोंधळून गेल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसतं की, एक महिला सईला विचारते की, एका मुलीला खायला तीन केळे लागतात, तर केळीवालीकडे फक्त २ डझन केळी आहे. तर किती मुली केळी खातील? या प्रश्नावर सई ४ असं उत्तर देते.
यावर सुबोध तिला उत्तरामागचं लॉजिक विचारतो. तर सई म्हणते की ते नको विचारू पण चार बरोबर आहे का? सुबोध सईला दोन डझन म्हणजे किती? असं विचारतो. यावर सई १२ असं उत्तर देते. पण, लगेच तिच्या चूक लक्षात येते आणि २४ असं उत्तर देते. यानंतर सई ३ चा पाढा म्हणू लागते पण त्यात ती चुकते. यावर सई वैतागून म्हणते की तीनचाच पाडा आहे ना मग एवढा का सस्पेन्स ठेवताय सांगा उत्तर. मग सुबोध तिला बरोबर उत्तर सांगतो. ३ चा पाढा म्हणताना सईची ही अवस्था पाहून तिचा आणि गणिताचा छत्तीसचा आकडा असल्याचं दिसतंय.
सईच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, ती लवकरच नागराज मंजुळेच्या 'मटका किंग'मध्ये झळकणार आहे. याशिवाय 'ग्राउंड झिरो' आणि 'अग्नी' सिनेमात ती झळकणार आहे. तसेच सई ताम्हणकर 'डब्बा कार्टेल' या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. सईने नुकतेच अभिनयाव्यतिरिक्त वेगळ्या क्षेत्रात पदार्पण केलंय. ती उद्योजिका बनली आहे. सई ताम्हणकरने कपड्यांचा बिझनेस सुरू केलाय. मॅडम एस असे तिच्या ब्रॅण्डचे नाव आहे.