राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त सई ताम्हणकरने दिली गुड न्यूज! जागतिक पातळीवर करणार महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 06:34 PM2023-01-25T18:34:46+5:302023-01-25T18:35:12+5:30

Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकर आता जागतिक पातळीवर महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहे. राष्ट्रीय पर्यटन दिनी केली मोठी घोषणा.

Sai Tamhankar gave good news on the occasion of National Tourism Day! Maharashtra will be represented at the global level | राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त सई ताम्हणकरने दिली गुड न्यूज! जागतिक पातळीवर करणार महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व

राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त सई ताम्हणकरने दिली गुड न्यूज! जागतिक पातळीवर करणार महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व

googlenewsNext

मराठीचं नव्हे तर बॉलिवूड विश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिचं नाव घेतलं जात. केवळ अभिनयच नाही तर, सई तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते. अभिनेत्रीने तिच्या प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे. सई आता ग्लोबल न्यूज चॅनेलवर झळकणार आहे. ती नॅशनल जिओग्राफिक इन इंडिया या शोमधून महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहे.

महाराष्ट्र हे असे ठिकाण आहे, जो अनेक ऐतिहासिक हॉटस्पॉट्स, रंगीबेरंगी धार्मिक स्थळे, गुहा आणि अन्नपदार्थांचा अप्रतिम संग्रह आहे एक असे राज्य जे आपल्याबरोबर एक दिव्य, समृद्ध आणि चैतन्यशील संस्कृती आणते. आपल्या कथाकथनाच्या  स्फूर्तिदायक आणि अस्सल शैलीसह नॅशनल जिओग्राफिक इन इंडिया अभिनेत्री सई ताम्हणकरसह मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना एका अनुभवात्मक प्रवासाला घेऊन जाणार आहे- 'पोस्टकार्ड्स फ्रॉम महाराष्ट्र' या मालिकेद्वारे, त्यांना विविध आकर्षणांसहित या भारतीय राज्याची वैभवशाली अद्वितीय संस्कृती अनुभवायला लावणार आहे. 

२९ डिसेंबर २०२२ पासून सुरू होणाऱ्या नॅशनल जिओग्राफिकवर प्रीमियर होत असलेल्या या सात भागांच्या मालिकेत सई ताम्हणकरला फॉलो केले जाणार आहे, कारण ती विविध पाककृती दाखवणार आहे आणि तिच्या मातृभूमीशी तिचे ऋणानुबंध मजबूत करताना दिसणार आहे. ऐतिहासिक प्रार्थनास्थळे, किल्ले, जुनी स्मारके यांच्यापासून ते ऐतिहासिक प्रार्थनास्थळे, औरंगाबादमधील युनेस्कोच्या वारसास्थळांपासून ते पुणे आणि नाशिकच्या दिव्य मंदिरांपर्यंतच्या ठिकाणांवरही या कथांमधून प्रकाश टाकण्यात येणार आहे. सई शहरांमधील तोंडाला पाणी सुटणारे खाद्यपदार्थ आणि शॉपिंग ठिकाणांचा शोध घेताना दिसणार आहे.

सई ताम्हणकर म्हणाली की, महाराष्ट्र पर्यटनाच्या सहकार्याने नॅशनल जिओग्राफिक-एक ब्रँड जो त्याच्या अभ्यासपूर्ण कथाकथनासाठी ओळखला जातो– सोबत माझे स्वतःचे राज्य एक्सप्लोर करणे ही माझ्यासाठी खरोखरच सन्मानाची गोष्ट आहे. या संधीच्या माध्यमातून मला गूढ सौंदर्य, रुचकर पदार्थ आणि प्रवासासारखी समृद्ध मराठी संस्कृती यांबद्दलचं माझं प्रेम अनुभवण्याची आणि पुन्हा एकदा उजाळा देण्याची संधी मिळाली. मालिकेचा भाग असल्यामुळे मला मराठी मुलगी असल्याचा अभिमान वाटला आणि या मालिकेचे माझ्या हृदयात नेहमीच एक विशेष स्थान असेल. 'पोस्टकार्ड्स फ्रॉम महाराष्ट्र'चा प्रीमियर २९ डिसेंबरपासून भारतामध्ये नॅशनल जिओग्राफिक चॅनेलवर होणार आहे.

Web Title: Sai Tamhankar gave good news on the occasion of National Tourism Day! Maharashtra will be represented at the global level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.