राजस्थानमध्ये सई ताम्हणकरचा झाला अपघात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 16:21 IST2020-03-04T16:14:09+5:302020-03-04T16:21:53+5:30
Sai Tamhankar's Accident : सई ताम्हणकरच्या चाहत्यांना वाटतेय तिची चिंता

राजस्थानमध्ये सई ताम्हणकरचा झाला अपघात...
सई ताम्हणकर सध्या तिचा आगामी सिनेमा मिमीच्या शूटिंगसाठी राजस्थानमध्ये बिझी आहे. सईचा हॉस्पिटलमध्ये एक फोटो सध्या व्हायरल होतो आहे. या फोटोत सईच्या पायाला दुखापत झालेली दिसतेय. दुखापत झाल्यावरही सईने शूटिंग थांबवले नाही. मिमीच्या शूटिंग दरम्यान सई ताम्हणकरच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. सिनेमाचे शूटिंग करुन हॉटेलवर परतत असताना तिचा पाय मुरगळला आणि सूज आली. डॉक्टरकडे घेऊन गेल्यावर पाय फ्रेक्चर झाल्याचे कळले.
सई म्हणाली,'' सुरुवातीला मला खूप भिती वाटली होती जेव्हा पाय फ्रॅक्चर झाल्याचे कळले. मला चिंता या गोष्टीची होती की सिनेमाचे शूटिंग मी कसे करेन कारण मला माहिती होते की जर मी शूटिंग थांबवले तर या गोष्टीचा परिणाम संपूर्ण टीमवर पडेल. मी खूप भाग्यवान आहे कारण संपूर्ण टीमने मला संभाळून घेतले आणि मी अजूनही शूटिंग सुरु ठेवले आहे.''
मिमी हा सिनेमा 'मला आई व्हायचंय' या मराठी सिनेमावर आधारित आहे. त्यामुळे सिनेमात काहीसा भावनिक अँगलही पाहायला मिळेल.यात क्रिती सॅनन सरोगेट मदरची भूमिका साकारणार आहे. या सिनेमात पंकज त्रिपाठी, सुप्रिया पाठक यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.. लक्ष्मण उत्तेकर या सिनेमाचे दिग्दर्शन करतायेत. 2020मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.