सई ताम्हणकरला आठवली तिची ही प्रसिद्ध भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 09:00 PM2019-01-07T21:00:00+5:302019-01-07T21:00:02+5:30
सईने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. तिने गेल्या काही वर्षांत अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तिने बालक पालक या चित्रपटात साकारलेली नेहा ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.
सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने दुनियादारी, बालक पालक, वजनदार यांसारख्या मराठी चित्रपटात तर हंटर, गजनी यांसारख्या हिंदी चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सईचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे. त्यामुळे आपल्या या आवडत्या अभिनेत्रीच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता सईच्या चाहत्यांना नेहमीच असते आणि सईदेखील सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. त्यामुळे इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक यांसारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर तिचे फॅन्स तिला मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. सईने तिच्या ट्विटरच्या अकाऊंटवर नुकतेच केवळ नेहा ताई असे लिहिले असून त्यासोबत काही टॅग्स दिले आहेत. ही पोस्ट वाचल्यानंतर सईला तिच्या एका प्रसिद्ध चित्रपटातील भूमिकेची आठवण आली असल्याचे लगेचच लक्षात येत आहे.
सईने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. तिने गेल्या काही वर्षांत अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तिने बालक पालक या चित्रपटात साकारलेली नेहा ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. याच चित्रपटाला सहा वर्षं पूर्ण झाल्याबद्दल सईने ट्विटरला ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत तिने या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव, निर्माते रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, उत्तुंग ठाकूर यांना टॅग केले आहे.
माणसाच्या लैंगिक व्यवहारांबद्दल लहान मुलांना कुतूहल असणं अगदी साहजिक आहे. आपल्या पातळीवर ती ठिकठिकाणांहून या विषयातली माहिती गोळा करत असतात. आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी त्यांचा सगळ्यात सोपा स्त्रोत म्हणजे त्यांची मित्रमंडळी. शाळेत, बसमधून ये- जा करताना एकमेकांच्या थोड्याथोडक्या माहितीवरून एकमेकांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला जातो. घरातली मोठी भावंडं, सोसायटीतले ताई-दादाही हीदेखील शंका विचारण्यासाठीची हक्काची ठिकाणं असतात. माहितीची राहिलेली राहिलेली कसर चित्रपट आणि इंटरनेटच्या माध्यमातून भरून काढली जाते, याच विषयावर भाष्य करणारा बालक पालक हा चित्रपट होता. या चित्रपटाला समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील खूप चांगली कमाई केली होती.
नेहा ताई. #6yearsofBP@mfc@meranamravi@Riteishd@geneliad@UttungThakur#BalakPalak#बालकपालक
— Sai (@SaieTamhankar) January 4, 2019