चॅलेंज ! सई ताम्हणकरसोबत फोटोत दिसणाऱ्या या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला ओळखून दाखवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 18:15 IST2021-12-27T18:13:30+5:302021-12-27T18:15:45+5:30
अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सोशल मीडियावर सक्रिय असते. सईने नुकताच एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

चॅलेंज ! सई ताम्हणकरसोबत फोटोत दिसणाऱ्या या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला ओळखून दाखवा
अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सोशल मीडियावर सक्रिय असते. आपले फोटोशूट, सिनेमाच्या सेटवरचे फोटो किस्से ती चाहत्यांसोबत आवर्जून शेअर करत असते. सईने नुकताच एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात अभिनेत्रीसोबत आणखी एक मुलगी दिसतेय. ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री गिरीजा ओक आहे. आज गिरिजा ओकच्या वाढदिवसा निमित्ता तिला शुभेच्छा देण्यासाठी सईने तो फोटो पोस्ट केला आहे. मात्र सईने शेअर केलेल्या फोटोत ती गिरीजा ओक आहे याचा अंदाज बांधण कठीण जातेय. मात्र फोटो बघून दोघींमधलं बॉन्डिंग स्पष्ट दिसतंय.
हिंदी असो किंवा मराठी सिनेसृष्टीत तिने आपल्या अभिनयाने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती अभिनेत्री आहे गिरीजा ओक.वयाच्या 15 वर्षापासूनच गिरिजाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
अनेक प्रसिद्ध हिंदी आणि मराठी सिनेमात ती झळकली आहे.'लज्जा' ही मराठी मालिका तसेच 'लेडीज स्पेशल' या हिंदी मालिकेत गिराजीने साकारलेल्या भूमिकेला विशेष पसंती मिळाली होती. छोटा पडदाच नाही तर मराठी सिनेमांप्रमाणे हिंदी सिनेमातही तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.आमिर खानसोबत 'तारे जमीन पर' सिनेमातही ती झळकली आहे. जाहिराती, मालिका, सिनेमा, नाटक यानंतर गिरीजा शॉर्टफिल्मच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करत असते. गिरीजाने 2011 मध्ये सुहरूद गोडबोलेसह लग्न करत आपल्या आयुष्याची सुरुवात केली. या दोघांना एक मुलगाही आहे.