जितकी ग्लॅमरस तितकीच सोज्वळ, पाहा सई ताम्हणकरचा दिलखेचक अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 18:10 IST2020-08-19T17:58:45+5:302020-08-19T18:10:10+5:30
सई ताम्हणकरने नऊवारी साडी परिधान केली असून नाकात नथ, कपाळावर टीकली असा साजश्रृंगार केलेला पाहायला मिळत आहे.

जितकी ग्लॅमरस तितकीच सोज्वळ, पाहा सई ताम्हणकरचा दिलखेचक अंदाज
सई ताम्हणकर मराठी रसिकांची दिलों की धडकन म्हणून ओळखली जाते. तिची प्रत्येक अदा रसिकांना घायाळ करणारी अशी वाटते. सौंदर्य, अदा आणि उत्तम अभिनयाचा अनोखा मेळ सईमध्ये दिसत असल्याने रसिक तिचं तोंडभरुन कौतुक करतात. सईने आजवर विविध भूमिकांमधून रसिकांची मनं जिंकली आहेत. दमदार भूमिका साकारणारी सई तितकीच स्टायलिश आहे. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रसिकांसोबत संवाद साधत असते. शिवाय स्वतःचे फोटो आणि विचारही सोशल मीडियावर शेअर करते. नेहमीच सईचा तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो.
सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत तिने नऊवारी साडी परिधान केली असून नाकात नथ, कपाळावर टीकली असा साजश्रृंगार केलेला पाहायला मिळत आहे. तिने शेअर केलेला एक फोटो सध्या रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. एरव्ही मॉर्डन ड्रेसमध्ये दिसणारी सई पारंपरिक अंदाजामध्ये आणखीनच सुंदर दिसत आहे. यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.
नऊवारी साडी परिधान केलेला फोटो पाहून चाहते कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. विविध अंदाजातील तिचे फोटो रसिकांना नेहमीच भावतात. या मराठमोळ्या पद्धतीने नऊवारी साडी आणि दागदागिने परिधान केल्यामुळे तिचे सौंदर्य आणखी खुललं आहे. याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.