सई ताम्हणकर 'पाँडेचरी'मध्ये 'ही' गोष्ट करतेय एन्जॉय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 13:50 IST2019-02-01T13:41:05+5:302019-02-01T13:50:54+5:30
सई ताम्हणकरचा आगामी सिनेमा ‘पाँडेचरी’च्या शूटिंग आजपासून सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर सिनमेचा पहिले पोस्टर आऊट देखील झाले आहे.

सई ताम्हणकर 'पाँडेचरी'मध्ये 'ही' गोष्ट करतेय एन्जॉय
सई ताम्हणकरचा आगामी सिनेमा ‘पाँडेचरी’च्या शूटिंग आजपासून सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर सिनमेचा पहिले पोस्टर आऊट देखील झाले आहे. या पोस्टरमध्ये सई ब्लॅक अँड व्हाइट लूकमध्ये दिसतेय.
पाँडेचरी सिनेमाविषयी सई ताम्हणकर म्हणते, “ही पहिला सिनेमा आहे जो आयफोनवर शूट करण्यात येणार आहे. माझ्या भूमिकेचा लूक खूप नॅचरल आहे. नो-मेकअप, नो-हेअरस्टाइल लूकमध्ये मी ह्यात दिसेन. संपूर्ण चित्रपट पाँडेचरीत चित्रीत होईल. सिनेमाची प्रोसेस मी एवढी एन्जॉय करतेय की, पहिल्यांदाच एखाद्या कार्यशाळेला जात असल्यासारखी छान भावना आहे. प्रत्येक अभिनेत्रीच्या आयुष्यात असा सिनेमा यायला हवा, जेव्हा तुम्ही तुमच्या कम्फर्टझोनमधून बाहेर निघून काहीतरी वेगळं करता. त्यामुळे सध्या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी मी खूप उत्सुक आहे.”
सचिन कुंडलकर आणि सई ताम्हणकर यांच्या जोडीचा हा दुसरा सिनेमा आहे. ह्याअगोदर 2016मध्ये सचिन कुंडलकर दिग्दर्शित वजनदार चित्रपटामध्ये सई ताम्हणकरने काम केले होते. आता तीन वर्षांनी दोघेही एकत्र काम करत आहेत. त्यात सईचा नो-मेकअप रिएलिस्टिक लूक सईच्या ह्या नव्या भूमिकेविषयी उत्कंठा वाढवणारा आहे. त्यामूळे पाँडेचरीविषयी सध्या सईच्या चाहत्यांना आतूरता आहे.
काही दिवसांपूर्वीच सई ‘डेट विथ सई’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती. या वेबसीरिजमध्ये सईचा वेडसर फॅन तिचा पाठलाग करत असतो. जो सईच्या नकळत तिचे आपल्या मोबाइल कॅमे-यात चित्रीकरण करत असतो. ही एक थरारक वेबसीरिज होती. सई ही पहिलीच भारतीय अभिनेत्री आहे, जी वेबसीरिजमध्ये स्वत:च्याच भूमिकेत दिसली होती.