सई ताम्हणकर चाहत्यांना देणार नवीनवर्षाची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 11:53 AM2017-12-18T11:53:25+5:302017-12-18T17:23:25+5:30

वर्षाला किमान एक सुपरहिट चित्रपट देणारी सई ताम्हणकर २०१७ मध्ये चित्रपटांपासून थोडी दुरावलेले दिसली.'फॅमिली कट्टा' आणि 'वजनदार' ह्या चित्रपटातून ...

Sai Tamhankar will give a new year gift to fans | सई ताम्हणकर चाहत्यांना देणार नवीनवर्षाची भेट

सई ताम्हणकर चाहत्यांना देणार नवीनवर्षाची भेट

googlenewsNext
्षाला किमान एक सुपरहिट चित्रपट देणारी सई ताम्हणकर २०१७ मध्ये चित्रपटांपासून थोडी दुरावलेले दिसली.'फॅमिली कट्टा' आणि 'वजनदार' ह्या चित्रपटातून सईने लक्षात राहतील अशा भूमिका केल्या होत्या.त्यानंतर मात्र तिच्या प्रेक्षकांना पडद्यावर तिची कमी जाणवत होती. दरम्यानच्या काळात ती अनेक सामाजिक कार्यामध्ये सहभागी झाली. परंतु सईचा आगामी चित्रपट कोणता असेल याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. २०१८ मध्ये मात्र सई आपला नवीन चित्रपट घेऊन येतेय. नवीन वर्षाची भेट म्हणून सई लवकरच तिच्या चाहत्यांसाठी 'राक्षस' नावाचा सिनेमा घेऊन येत आहे. राक्षस सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज  करण्यात आले आणि प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला.आता पर्यंत सईने अनेक कलाकारांसोबत काम केले आहे त्यात सई-स्वप्नील ही जोडी प्रेक्षकांना फार आवडली, परंतु पहिल्यांदाच सई ताम्हणकर आणि शरद केळकर ह्या चित्रपटातून एकत्र काम करताना दिसतील. लई भारी नंतर शरद केळकरचा हा दुसरा मराठी चित्रपट असेल ज्यात तो सई ताम्हणकर सोबत दिसणार आहे.

आदिवासी पाड्यांवर लहानपण गेलेल्या ज्ञानेश झोटींग यांचं 'राक्षस'च लेखन अनुभवसिद्ध असून त्यांनी त्यांचे लहानपणचे अनुभव चित्रपटाच्या कथेत अतिशय सुंदरपणे गुंफले आहेत. समित कक्कड यांनी आतापर्यंत एकाहून एक अशा सरस चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं आहे. निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून समित कक्कड यांचा 'आयना का बायना' हा पहिला चित्रपट असून तो सोनी मॅक्ससाठी हिंदीत डब होणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे.शिवाय 'हाफ तिकीट' हा समित कक्कड यांचा दिग्दर्शक म्हणून दुसरा चित्रपट असून १५ निरनिराळ्या 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्स' मध्ये या चित्रपटाची निवड झाली होती आणि आता 'राक्षस' चे ते प्रस्तुतकर्ते आहेत.राक्षस चित्रपटात ऋजुता देशपांडे, दयाशंकर पांड्ये, विजय मौर्य, याकूब सैद, पूर्णानंद वांदेकर, उमेश जगताप, विठ्ठल काळे,पंकज साठे, अनुया कळसकर, अनिल कांबळे, मकरंद साठे, जयेश संघवी, सविता प्रभुणे, साक्षी व्यवहारे, अभिजित झुंझारराव, सोमनाथ लिंबारकर इत्यादी कलाकारांच्या सुंदर अभिनयानं वेगळ्या आशयाच्या या चित्रपटाला योग्य तो न्याय दिला आहे.'राक्षस' हा चित्रपट २३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 

Web Title: Sai Tamhankar will give a new year gift to fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.