सई ताम्हणकर लवकरच दिसणार या हिंदी सिनेमात, सोशल मीडियावर शेअर केले पोस्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 16:40 IST2021-07-08T16:39:42+5:302021-07-08T16:40:10+5:30
सई ताम्हणकरने तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती सोशल मीडिया इंस्टाग्रामवर दिली आहे.

सई ताम्हणकर लवकरच दिसणार या हिंदी सिनेमात, सोशल मीडियावर शेअर केले पोस्टर
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर हिने आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. तसेच सई बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. नुकतेच सई ताम्हणकरने तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती सोशल मीडिया इंस्टाग्रामवर दिली आहे.
सई ताम्हणकर हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर तिच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिले की, या जुलैमध्ये,सामान्य पासून विलक्षण अपेक्षा! संपर्कात रहा. मिमी.
सई ताम्हणकर मिमी या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत क्रिती सनॉन दिसणार आहे. हा चित्रपट मला आई व्हायचंय या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. मिमी चित्रपटाची कथा एका सरोगेट आईवर आधारीत आहे. क्रिती सनॉन अशा एका स्त्रीच्या भूमिकेत दिसणार आहे जी छोट्या गावातील असून तिला अभिनेत्री व्हायचे असते. यादरम्यान तिची भेट एका जोडप्याशी होते आणि ती सरोगेट आई व्हायचा निर्णय घेते. त्यानंतर तिच्या जीवनात काय बदल होतात, हे पाहण्यासाठी हा चित्रपट पहावा लागेल.
मिमी सिनेमात क्रिती सनॉन, सई ताम्हणकरसोबत पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकरने केले आहे.
सई ताम्हणकरची नुकतीच समांतर २मध्ये झळकली आहे. ती समांतरच्या पहिल्या भागात नव्हती. या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. याशिवाय ती पॉण्डिचेरी या मराठी चित्रपटात झळकणार आहे. तसेच मीडियम स्पाइसी या सिनेमातही दिसणार आहे.