​लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर सई ताम्हणकरचा जलवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 09:30 AM2018-06-22T09:30:30+5:302018-06-22T15:00:30+5:30

सई ताम्हणकरची फिल्म लव्ह सोनियाचा गुरूवारी लंडनला प्रिमियर झाला. लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलची ओपनिंग फिल्म म्हणून सईची लव्ह सोनिया ...

Sai Tamhankar wins at Red Carpet on London Indian Film Festival | ​लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर सई ताम्हणकरचा जलवा!

​लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर सई ताम्हणकरचा जलवा!

googlenewsNext
ताम्हणकरची फिल्म लव्ह सोनियाचा गुरूवारी लंडनला प्रिमियर झाला. लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलची ओपनिंग फिल्म म्हणून सईची लव्ह सोनिया सिलेक्ट झाली होती. फेस्टिव्हच्या ओपनिंग सेरेमनीला रेड कार्पेटवर झाराच्या आउटफिटमध्ये सई ताम्हणकर आली.
मराठी फिल्म इंडस्ट्रीतली सई ताम्हणकर पहिली अभिनेत्री आहे, जिला लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर वॉक करायचा मान मिळाला. सईसोबत रिचा चड्ढा, राजकुमार राव, मृणाल ठाकूर, मनोज बाजपेयी आणि चित्रपटाचे दिग्दर्शक तबरेज नुरानी सुद्धा रेड कार्पेटवर दिसून आले. यावेळी इंटरनॅशनल मीडियाशी बोलताना सई म्हणाली, “ माझ्या आजवरच्या प्रवासात बरेच चढ-उतार आले. पण याक्षणी मागे वळून पाहताना त्या चढ-उतारांचे चीज झाल्याचे दिसते आहे. या सिनेमाने मला जास्त सतर्क आणि संवेदनशील बनवले. प्रत्येकाने ही फिल्म पाहावी असं मला वाटतं. या सिनेमातलं कथानक हृदयस्पर्शी आहे. या सुंदर इंडो-वेस्टर्न सिनेमाचा मी एक हिस्सा असल्याचा आणि हा चित्रपट लंडन इंडरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा भाग असल्याचा मला अभिमान आहे.”
सई ताम्हणकरने दुनियादारी, बालक पालक, नो एंट्री पुढे धोका आहे यांसारख्या चित्रपटांमधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. आज मराठी इंडस्ट्रीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. तिने मराठी चित्रपटांसोबतच गजनी, हंटर यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. हंटर या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये मिळालेल्या यशानंतर ती दाक्षिणात्य इंडस्ट्रीकडे वळली आहे. लवकरच ती सोलो या दाक्षिणात्य चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट मल्याळम आणि तामिळ या दोन्ही भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोलो हा रोमँटिक थ्रिलर चित्रपट असून या चित्रपटाचे दिग्दर्शन बिजोय नामदार यांनी केले आहे तर डलकर सलमानची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. त्याचसोबत डिनो मोरिया, नेहा शर्मा हे बॉलिवूडमधील कलाकार देखील या चित्रपटात झळकणार आहेत. 

Also Read : विद्या बालनची फॅन झाली सई ताम्हणकर

 

Web Title: Sai Tamhankar wins at Red Carpet on London Indian Film Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.