सई ताम्हणकरने पुन्हा एकदा दाखवली घराची झलक, व्हिडीओला मिळतेय पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 18:10 IST2024-01-12T18:10:15+5:302024-01-12T18:10:38+5:30
Saie Tamhankar : इतकी वर्षे सई मुंबईत भाडेतत्वावर राहत होती. पण आता ती मुंबईकर झाली आहे. तिने स्वत:चे हक्काच घर खरेदी केले आहे.

सई ताम्हणकरने पुन्हा एकदा दाखवली घराची झलक, व्हिडीओला मिळतेय पसंती
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) सतत चर्चेत येत असते. पण अनेकांना ही गोष्ट माहित नसेल की इतकी वर्षे सई मुंबईत भाडेतत्वावर राहत होती. आता सई मुंबईकर झाली असून तिने स्वत:चे हक्काच घर खरेदी केले आहे. त्या घराला ती माझे घर असे हक्काने बोलत असते. नुकतेच सईने सोशल मीडियावर तिच्या घराचा व्हिडीओ शेअर केला आहे.
सईने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात ती तिच्या घरातल्या आवडत्या जागेबद्दल सांगत आहे. लिव्हिंग हॉलमध्ये ती खिडकीतून छान आणि खेळती हवा राहते असे सांगते आहे. तसेच सोफा ही तिची आवडती जागा असल्याचे तिने म्हटले आहे. त्यानंतर तिने किचनमध्ये एका कपाटातील मगबद्दल सांगितले. तिला कॉफी खूप आवडते. त्यामुळे तिच्या मूडप्रमाणे ती कपची निवड करते. त्यानंतर फ्रिजवरील मॅग्नेटबद्दल सांगितले. तिला ते खूप आवडतात असे म्हटले. तसेच एका मॅग्नेट तिच्या फ्रेंडच्या मुलीने तिला दिले आहे. त्यानंतर तिने तिचा बहिणीसोबतचा फोटो दाखवला. तसेच तिने आई-बाबांचाही फोटो मॅग्नेट फ्रिजवर लावला आहे. सईचा हा व्हिडीओ मॅशेबल इंडियाने बनवला आहे. सई ताम्हणकरच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
वर्कफ्रंट
सई ताम्हणकर आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. 'सनई चौघडे',' बालक पालक', 'क्लासमेट्स', 'व्हाय झेड' अशा अनेक सुपरहिट चित्रपटांतून सईने अभिनयाची छाप पाडली. 'नो एन्ट्री : पुढे धोका आहे' या चित्रपटातील सईचा बोल्ड अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले होते. मराठीबरोबरच सईने बॉलिवूडमध्येही नाव कमावलं. 'हंटर', 'मिमी' या चित्रपटांमध्ये सई महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली. ती लवकरच श्रीदेवी प्रसन्न या सिनेमात दिसणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत आहे.