'सैराट'ची ८ वर्ष पूर्ण! रिंकूने शेअर केले सेटवरील आर्ची - परश्याचे कधीही न बघितलेले खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 12:42 IST2024-04-29T12:41:28+5:302024-04-29T12:42:28+5:30
ब्लॉकबस्टर 'सैराट' ला आज ८ वर्ष पूर्ण. रिंकूने शेअर केले सेटवरचे आजवर कधीही न पाहिलेले फोटो (sairat, rinku rajguru)

'सैराट'ची ८ वर्ष पूर्ण! रिंकूने शेअर केले सेटवरील आर्ची - परश्याचे कधीही न बघितलेले खास फोटो
'सैराट' सिनेमा माहित नाही असा एकही भारतीय आढळणार नाही. केवळ मराठीच नाही तर अमराठी माणसांनीही 'सैराट'वर भरभरून प्रेम केलं. नागराज मंजुळेंचं दिग्दर्शन आणि अजय - अतुल यांनी दिलेलं संगीत यामुळे 'सैराट' सिनेमा चांगलाच गाजला. 'सैराट' सिनेमा महाराष्ट्राने डोक्यावर घेतला. आजही मराठी मनोरंजन विश्वातील जास्तीत जास्त बॉक्स ऑफिसवर गल्ला जमावणारा सिनेमा म्हणून 'सैराट'कडे पाहिलं जातं. 'सैराट'ला ८ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने रिंकूने आजवर कधीही न शेअर केलेले फोटो पोस्ट केले आहेत.
'सैराट'ला आज ८ वर्ष पूर्ण झाली. याविषयी रिंकू राजगुरुने एक पोस्ट केलीय. रिंकू लिहिते, "8 years of Sairat .. सैराटला आज ८ वर्ष पुर्ण झाली…" अशी पोस्ट लिहून रिंकूने 'सैराट'ला ८ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने खास आठवण जागवली आहे. रिंकूने एकूण तीन फोटो शेअर केलेत. यामध्ये पहिल्या फोटोत रिंकू आर्चीच्या भूमिकेत ऑन कॅमेरात खळखळून हसताना दिसतेय.
दुसऱ्या फोटोत आर्ची आणि परश्या म्हणजेच म्हणजेच रिंकू - आकाश यांनी लव्ह साईन करुन कॅमेरात रोमँटिक पोज दिली आहे. तिसऱ्या फोटोत रिंकू आर्चीच्या भूमिकेत घोड्यावर बसलेली दिसतेय. अशाप्रकारे रिंकूने 'सैराट' मधील कधीही न पाहिलेले फोटो शेअर केलेत. रिंकूच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.रिंकू सध्या आगामी 'खिल्लार' सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.