Sairat : ‘सैराट’ फेम अभिनेता तानाजी गालगुंडे देतोय ‘या’ आजाराशी झुंज, रूग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 12:12 PM2022-07-06T12:12:09+5:302022-07-06T12:12:51+5:30

Sairat fame actor admitted in hospital : आर्ची-परश्याच्या प्रेमाला शेवटपर्यंत साथ देणारा आयडियल मित्र ‘लंगड्या’ म्हणजेच तुमचा-आमचा लाडका तानाजी गालगुंडे (Tanaji Galgunde) सिनेमात भाव खाऊन गेला होता. याच तानाजीबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे.

Sairat fame actor Tanaji Galgunde admitted in hospital | Sairat : ‘सैराट’ फेम अभिनेता तानाजी गालगुंडे देतोय ‘या’ आजाराशी झुंज, रूग्णालयात दाखल

Sairat : ‘सैराट’ फेम अभिनेता तानाजी गालगुंडे देतोय ‘या’ आजाराशी झुंज, रूग्णालयात दाखल

googlenewsNext

दमदार कथानक आणि नवख्या  कलाकारांच्या अभिनयाने सजलेला ‘सैराट’ (Sairat ) आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. चित्रपटातील लंगड्याचं पात्र साकारणारा तानाजी गालगुंडे चांगलाच गाजला होता. आर्ची-परश्याच्या प्रेमाला शेवटपर्यंत साथ देणारा आयडियल मित्र ‘लंगड्या’ म्हणजेच तुमचा-आमचा लाडका तानाजी गालगुंडे (Tanaji Galgunde) सिनेमात भाव खाऊन गेला होता. याच तानाजीबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे.

तानाजी सध्या एका आजाराचा सामना करतोय. तानाजीला काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या सिव्हिल रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, पोटात दुखत असल्याने त्याला त्रास होत होता. डॉक्टरांनी त्याला उपचारांसाठी रूग्णालयात भरती व्हायला सांगितलं. डॉ. अमेय ठाकूर त्याच्यावर उपचार करत असून त्याच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार आहेत. उपचारानंतर तानाजी ठणठणीत होईल, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

‘सैराट’ या सिनेमानंतर तानाजीचं अख्खं आयुष्य बदलून गेलं. ‘सैराट’ प्रदर्शित होईपर्यंत गावात तानाजी गलगुंडे नावाचा मुलगा राहतो, हेही कोणाला फारसं माहित नव्हतं. पण ‘सैराट’ प्रदर्शित झाला आणि तानाजी अवघ्या महाराष्ट्राचा स्टार झाला. ‘सैराट’च्या कन्नड व्हर्जनमध्ये त्यानं काम केलं. यानंतर तो ‘गस्त’ या चित्रपटात झळकला. अगदी मुख्य नायकाची भूमिका त्याला मिळाली.

यानंतर ‘भिरकिट’ या सिनेमातही तो झळकला. शिवाय ‘मनं झालं बाजिंद’ या मालिकेतही त्यानं काम केलं. मध्यंतरी तानाजी एका न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आला होता. शरीराची सकारात्मकता या विषयावर हे खास फोटोशूट करण्यात आलं होतं.
  

Web Title: Sairat fame actor Tanaji Galgunde admitted in hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.