सैराट फेम आकाश ठोसर का गाळतोय जिममध्ये घाम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 04:50 PM2018-07-17T16:50:44+5:302018-07-17T16:53:25+5:30

आकाश ठोसर नुकताच एका वेबसिरिजमध्ये झळकला होता आणि आता या नंतर तो सध्या त्याच्या फिटनेसकडे अधिकाधिक लक्ष देत आहे. तो फिटनेसच्या बाबतीत सतर्क असल्याचे त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून आपल्याला कळत आहे.

Sairat fame akash thosar taking efforts in Gym | सैराट फेम आकाश ठोसर का गाळतोय जिममध्ये घाम?

सैराट फेम आकाश ठोसर का गाळतोय जिममध्ये घाम?

googlenewsNext

सैराट या चित्रपटामुळे आकाश ठोसरला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील त्याने साकारलेली परश्याची भूमिका चांगलीच गाजली होती. या चित्रपटामुळे आकाश ठोसर एका दिवसांत स्टार झाला. आकाशचा सैराट हा पहिलाच चित्रपट असला तरी त्याने आपल्या अभिनयाने या चित्रपटात एक छाप सोडली. या चित्रपटानंतर एफयू या चित्रपटात आकाश झळकला होता. पण आकाशला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटानंतर आकाश आता कोणत्या चित्रपटात झळकणार याची त्याच्या फॅन्सना उत्सुकता लागली आहे.
आकाश ठोसर नुकताच एका वेबसिरिजमध्ये झळकला होता आणि आता या नंतर तो सध्या त्याच्या फिटनेसकडे अधिकाधिक लक्ष देत आहे. तो फिटनेसच्या बाबतीत सतर्क असल्याचे त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून आपल्याला कळत आहे. कारण त्याने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आकाश व्यायाम करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तो त्याच्या आगामी चित्रपटासाठी तयारी करत आहे का अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. एवढेच नव्हे तर त्याच्या फिटनेसचे कौतुक देखील सोशल मीडियावर त्याचे फॅन्स करत आहेत. 
कुस्तीची आवड असण्यार्‍या आकाशचा जन्म पुणे येथे झाला. त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून झाले आहे. सैराट या चित्रपटाचा नायक शोधण्यासाठी दिग्दर्शक नागराज मंजुळे पुण्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये फिरले, अखेर पुण्याचाच असणारा, पण करमाळ्यात तालमीसाठी गेलेल्या आकाशच्या रुपाने त्यांना हा नायक मिळाला. आकाशला पाहिल्यानंतर सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या भावाने त्याचे छायाचित्र काढून नागराज मंजुळेना पाठवले. नागराज मंजुळे यांना आकाशचा चेहरा प्रचंड आवडला आणि त्यांनी त्याला आपल्या चित्रपटात घेतले आणि तेथूनच त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. आकाश हा एक चांगला कुस्तीपटू असल्याने त्याची शरीरयष्टीही तशीच दणकट होती. मात्र या चित्रपटातील कॉलेजवयीन मुलाची भूमिका साकारण्यासाठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आकाशला वजन कमी करण्यास सांगितले. त्यानुसार त्याने महिन्याभरात १३ किलो वजन कमी केले. 

 

Web Title: Sairat fame akash thosar taking efforts in Gym

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.