'सैराट'मधील आर्चीच्या वडिलांची पत्नी दिसते इतकी सुंदर, अभिनेत्रींनाही देते टक्कर, पाहा Reel व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 18:37 IST2025-01-15T18:36:34+5:302025-01-15T18:37:16+5:30
Suresh Vishwakarma: सुरेश विश्वकर्मा बऱ्याचदा आपल्या पत्नीसोबतचे फोटो शेअर करतो. त्याच्या पत्नीचा सिनेइंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही. मात्र तिच्या रिलला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.

'सैराट'मधील आर्चीच्या वडिलांची पत्नी दिसते इतकी सुंदर, अभिनेत्रींनाही देते टक्कर, पाहा Reel व्हिडिओ
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' (Sairat Movie) चित्रपटातून अभिनेता सुरेश विश्वकर्मा (Suresh Vishwakarma) घराघरात पोहचला आहे. त्याने या चित्रपटात आर्चीच्या वडिलांची भूमिका केली होती. त्याने साकारलेली सैराट सिनेमातील भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. या चित्रपटानंतर त्यांच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. सुरेश विश्वकर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. सुरेश विश्वकर्मा बऱ्याचदा आपल्या पत्नीसोबतचे फोटो शेअर करतो. त्याच्या पत्नीचा सिनेइंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही. मात्र तिच्या रिलला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.
सुरेश विश्वकर्माच्या पत्नीचे नाव विद्या विश्वकर्मा असून ती सौंदर्यात अभिनेत्रींना टक्कर देते. मात्र ती लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते. विद्या विश्वकर्मा सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. सोशल मीडियावर ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकतेच तिने सैराट सिनेमातील आता गं बया का बावरलं या गाण्यावर ट्रान्सफॉर्मेशन रिल बनवला आहे. यात ती खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या रिलला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
वर्कफ्रंट
सुरेश विश्वकर्मा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर गावातून मुंबईत आला आणि त्याच्या स्ट्रगलला इथून सुरुवात झाली. या दरम्यान स्टेज शो, मालिका, चित्रपटांपासून ते अगदी पथनाट्यांमध्येही त्याने काम केले. परंतु, त्याला खरी ओळख मिळाली ती नागराज मंजुळेच्या सैराट चित्रपटामुळे. सुरेश विश्वकर्माने सैराट चित्रपटाशिवाय रेगे, महिमा खंडोबाचा, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या मराठी चित्रपटातही काम केले आहे.