'झिम्मा 2' हिट होत असतानाच रिंकूला मिळालं मोठं सरप्राइज; आईवडिलांनी दिली 'ही' भेटवस्तू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 13:09 IST2023-11-27T12:59:47+5:302023-11-27T13:09:48+5:30
Rinku rajguru: रिंकूने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आईवडिलांचे आभार मानले आहेत.

'झिम्मा 2' हिट होत असतानाच रिंकूला मिळालं मोठं सरप्राइज; आईवडिलांनी दिली 'ही' भेटवस्तू
'सैराट'मधील आर्ची ते 'झिम्मा 2' मधली तानिया असा प्रवास करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु (rinku rajguru) नुकताच रिंकूची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला झिम्मा २ हा सिनेमा रिलीज झाला.या सिनेमात तिने केलेल्या अभिनयाचं सर्व स्तरांमधून कौतुक केलं जात आहे. घरीदारी सगळीकडे रिंकूवर शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे. यामध्येच तिच्या आई-बाबांनी सुद्धा तिला एक गोड सरप्राइज दिलं आहे. एकीकडे सिनेमा हिट होत असताना तिच्या आईवडिलांनी तिला छान एक भेटवस्तू दिली आहे.
रिंकू सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती तिच्याविषयीचे अनेक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर करत तिच्या आईवडिलांनी दिलेल्या गिफ्टविषयी सांगितलं आहे.
रिंकूच्या आईवडिलांनी तिला आयफोन १५ प्रो मॅक्स (iphone 15 pro max) भेट म्हणून दिला आहे. या नव्या आयफोनचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीत शेअर करत तिने तिच्या आईबाबांचे आभार मानले आहेत. “या सरप्राइजसाठी आय लव्ह यू आई-बाबा.” असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय. सोबतच आणखी एक स्टोरी शेअर करत एक फोटो पोस्ट केलाय. यात आई-वडील मुलीची काळजी घेताना दिसत आहे.
दरम्यान, 'सैराट' या सिनेमातून रिंकूने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. या सिनेमानंतर तिने झुंड, कागर, आठवा रंग प्रेमाचा अशा काही सिनेमांमध्ये काम केलं. त्यानंतर ती ओटीटीवरही झळकली आहे. हंड्रेड या वेबसीरिजमध्ये तिने काम केलं आहे.