मन रानात गेलं! 'सैराट'मधील लंगड्या गावी शेतात चांगलाच रमला, इन्स्टाग्रामवर केले फोटो शेअर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 01:57 PM2024-06-19T13:57:11+5:302024-06-19T13:58:05+5:30

तानाजी गालगुंडेने सोशल मीडियावर गावाकडचे काही फोटो शेअर केले आहेत.

Sairat marathi movie fame tanaji galgunde shared his farming and village photos and videos on social media | मन रानात गेलं! 'सैराट'मधील लंगड्या गावी शेतात चांगलाच रमला, इन्स्टाग्रामवर केले फोटो शेअर!

मन रानात गेलं! 'सैराट'मधील लंगड्या गावी शेतात चांगलाच रमला, इन्स्टाग्रामवर केले फोटो शेअर!

2016 साली आलेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' सिनेमाने मराठी मनोरंजनविश्वात इतिहास घडवला. आर्ची-परश्याची जोडी कमालीची हिट झाली. आजही सिनेमाची आणि यातील कलाकारांची तेवढीच चर्चा असते. त्यातलीच एक व्यक्तिरेखा परश्याचा मित्र लंगड्याची अर्थात तानाजी गालगुंडे (Tanaji galgunde). तानाजी गालगुंडे सध्या आपल्या गावी रमला आहे. तानाजी अभिनयक्षेत्रात काम करत आहे. तरी त्याची गावाशी जोडलेली नाळ कायम आहे. 

तानाजी गालगुंडेने सोशल मीडियावर गावाकडचे काही फोटो शेअर केले आहेत. यातून त्याचं मन गावी रमल्याचं दिसून येत आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या काही फोटोमध्ये तो शेळ्या चरायला घेऊन गेला असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केलाय.  तानाजी हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. यातून त्याच्या शेताची आणि गावची खास झलक पाहायला मिळते. 

तानाजीनं अनेक मराठी सिनेमांमध्ये तो छोट्या छोट्या भूमिका करतो. काही महिन्यांपूर्वी आलेल्या "नवरदेव बीएससी ॲग्री" सिनेमातही तो झळकला. "सैराट"च्या कन्नड व्हर्जनमध्ये त्यानं काम केलं. यानंतर तो "गस्त" या चित्रपटात झळकला. अगदी मुख्य नायकाची भूमिका त्याला मिळाली. तसेच "भिरकिट" या सिनेमातही तो झळकला. शिवाय "मनं झालं बाजिंद" या मालिकेतही त्यानं काम केलं आहे. तुलनेनं ग्लॅमर नसलेला तानाजीचा चेहरा प्रेक्षकांचा आवडता आहे. तानाजीला नव्या रूपात आणि मुख्य भूमिकेत बघायला अनेकजण उत्सुक आहेत. 

Web Title: Sairat marathi movie fame tanaji galgunde shared his farming and village photos and videos on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.