सखी गोखलेने या कारणामुळे नाट्यरसिकाला सांगितले आपल्या आईचे नाव,काय झालं ट्विटरवर जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 11:05 AM2018-04-26T11:05:43+5:302018-04-26T16:35:43+5:30
कलाकारांची मुलं आणि मुलं अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणं ही काही नवी गोष्ट नाही. आम्ही चालवू हा पुढे वारसा म्हणत ...
क ाकारांची मुलं आणि मुलं अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणं ही काही नवी गोष्ट नाही. आम्ही चालवू हा पुढे वारसा म्हणत चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मुलं मुली या क्षेत्रात येतात. हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीत अशी कलाकारांच्या मुला-मुलींची उदाहरणं आहेत. आपल्या आई वडिलाप्रमाणे स्वतःच्या अभिनयाने त्यांनी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशाच स्टार किड्सपैकी एक म्हणजे अभिनेत्री सखी गोखले. दिवंगत अभिनेता मोहन गोखले आणि प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांची कन्या असलेल्या सखीने अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिल, दोस्ती, दुनियादारी या मालिकेतून घराघरात पोहचलेल्या सखीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या सखी अमर फोटो स्टुडिओ या नाटकातही ती काम करत आहे. याशिवाय 'दिल दोस्ती दोबारा','रंग्रेज', 'तुकाराम' या सिनेमात भूमिका साकारल्या आहेत. आपल्या यशाचे श्रेय सखी कायमच आपल्या पालकांना विशेषतः आपली आई शुभांगी गोखले यांना देते. तिने अनेकदा आपल्या आईचं आपल्या जीवनात किती मोलाचं स्थान आहे हे जाहीररित्या सांगितलं आहे.याचीच प्रचिती पुन्हा एकदा सोशल मीडियावर आली आहे.एका नाट्य रसिकाकडे साखर खाल्लेला माणूस या नाटकाची दोन तिकीटे होती. या नाटकात प्रशांत दामले आणि शुभांगी गोखले यांची प्रमुख भूमिका आहे. मात्र काही कामामुळे या नाट्य रसिकाला या नाटकाला जाणं शक्य नसल्याने तसं ट्विट त्याने केले. प्रशांत दामले आणि सखी गोखलेच्या आईची भूमिका असणा-या नाटकाची दोन तिकीटे आहेत. कुणाला हवी असल्यास संपर्क करणे असं ट्विट त्याने केले. याच ट्विटला सखीने उत्तर दिले आहे. या ट्विटमधील सखीची आई यावर तिने या नाट्य रसिकाला उत्तर दिले आहे. त्या अभिनेत्रीचे नाव शुभांगी गोखले आणि मी त्यांची मुलगी. कुणाला तिकीटं हवं असल्यास घ्या असं उत्तर तिने ट्विट करुन दिले आहे.
आईचे आपल्या जीवनातील योगदान आणि तिचे स्थान काय आहे हे सखी सांगत असते. मात्र माझी ओळख आईमुळे असून माझ्यामुळे आईची नाही असंच कदाचित सखीला यातून सांगायचं असेन. दुसरीकडे त्या नाट्य रसिकाला शुभांगी गोखलेंचं नाव माहित नसणं आणि त्याच्या लेखी त्यांची ओळख सखीच्या आई अशी असेन तर ही बाब शुभांगी गोखले यांच्यासाठीही अभिमानास्पद अशी असावी.कारण आपल्या नावापेक्षा मुलांच्या नावाने ओळखलं जाणं ही कोणत्याही पालकासाठी अभिमानाचीच गोष्ट,नाही का?