'बालवाडीत शाळेतला रुमाल, तिच्या डोळयातलं कौतुक आणि..", राष्ट्रीय पुरस्कारादरम्यानचा सलील कुलकर्णींनी शेअर केला खास क्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 02:18 PM2023-10-23T14:18:08+5:302023-10-23T15:13:44+5:30

सलील कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक आईसोबतचा फोटो शेअर केला आहे.

Saleel kulkarni share special photo of national awards with mother | 'बालवाडीत शाळेतला रुमाल, तिच्या डोळयातलं कौतुक आणि..", राष्ट्रीय पुरस्कारादरम्यानचा सलील कुलकर्णींनी शेअर केला खास क्षण

'बालवाडीत शाळेतला रुमाल, तिच्या डोळयातलं कौतुक आणि..", राष्ट्रीय पुरस्कारादरम्यानचा सलील कुलकर्णींनी शेअर केला खास क्षण

 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा वितरण सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सलील कुलकर्णींना यांना सन्मानित करण्यात आलं. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारात एकदा काय झालं या मराठी चित्रपटाने मोहोर उमटवली. या चित्रपटासाठी सलील कुलकर्णींना राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. याखास क्षणी त्यांचं कुटुंबही त्यांच्यासोबत उपस्थित होतं.

 सलील कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर यादरम्यानचा एक आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. यात त्यांची आई त्यांच्या कोटला राष्ट्रीय पुरस्काराचा बॅच लावताना दिसतेय. 

हा फोटो शेअर करताना सलील कुलकर्णी यांनी लिहिले, ''बालवाडीत शाळेत जातांना तिने माझ्या शर्टाला pin up केलेला रूमाल ते ...राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला लावलेला हा विशेष batch …'' अनेक सेलिब्रेटी आणि चाहत्यांनी त्यांच्या या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. 

 

दरम्यान डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित एकदा काय झालं या सिनेमात  एका गोष्ट सांगणाऱ्या बाबाची कहाणी सादर केली आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून मुलांपर्यंत विचार पोहोचवण्याची कला अवगत असलेला बाबा आणि त्याच्या मुलाची, त्याच्या कुटुंबाची, त्याच्या शाळेची, त्याच्या प्रामाणिकपणाची आणि त्याच्या दृढ निश्चयांची गोष्ट या चित्रपटात यात आहे. याला संगीतही सलील यांनीच दिलं. यात गोष्टी आणि नाटकांच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देण्याला प्राधान्य देणारा शिक्षक किरण आणि त्याचा मुलगा चिंतन यांची भावस्पर्शी कथा यात आहे.
 

Web Title: Saleel kulkarni share special photo of national awards with mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.