"उगीचच माज...", पाकिस्तानी खेळाडूचा सलील कुलकर्णींनी घेतला पुणेरी पाहुणचार, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 18:49 IST2025-02-25T18:40:09+5:302025-02-25T18:49:40+5:30

भारताने सामना जिंकल्यानंतर आता अनेकांनी अबरार अहमदला सुनावलं आहे.

Saleel Kulkarni Slams Pakistani Player Abrar Ahmed Shares Post For Controversial Send-off To Shubman Gill In India Vs Pakistan Match In Icc Champions Trophy | "उगीचच माज...", पाकिस्तानी खेळाडूचा सलील कुलकर्णींनी घेतला पुणेरी पाहुणचार, म्हणाले...

"उगीचच माज...", पाकिस्तानी खेळाडूचा सलील कुलकर्णींनी घेतला पुणेरी पाहुणचार, म्हणाले...

Saleel Kulkarni: दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये रंगलेल्या  सामन्यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात २४२ धावांचे आव्हान टीम इंडियाने (India vs Pakistan in the Champions Trophy) सहज पार केले. या सामन्यात ६ गडी राखून भारताने विजय मिळवला. पण, सामन्यात जबरदस्त फॉर्मात आलेल्या  पाकिस्तानी क्रिकेटपटू अबरार अहमदने शुभमन गिलची विकेट घेतली. यानंतर अबरारने गिलला डोळ्यांनी ड्रेसिंग रूमकडे जाण्याचा इशारा केला.  

शुभमन गीलसोबत अबरारचं वागणं नेटकऱ्यांना खटकले. भारताने सामना जिंकल्यानंतर आता अनेकांनी अबरार अहमदला सुनावलं (Saleel Kulkarni Slams Pakistani Player Abrar Ahmed) आहे. सोशल मीडियावर काही मीम्सही व्हायरल होत आहेत. यावर आता मराठी कलाविश्वातील लोकप्रिय संगीतकार व गायक सलील कुलकर्णी यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. 

सलील कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यातून त्यांनी   पाकिस्तानी क्रिकेटपटू अबरार अहमदला चांगलंच सुनावलं आहे. 


तर बालमित्रांनो ,
हा माणूस पाहा…
उगीचच माज करताना दिसतो आहे.

तुम्ही 'दबंग २' पाहिला असेलच. त्यात गुंड विधायक बच्चा याचा भाऊ गेंदा लग्नात मुलीला पळवायला जातो आणि मग चुलबूल पांडे येतो. तेव्हा हा छोटा गुंडूकला खूप बडबड करतो. तेव्हा त्याचा Assistant गुंड 'लगता है गेंदा भैय्या भावनोमे बह गये है' असं म्हणतो आणि मग चुलबूल पांडे त्या गेंदाची मान मोडतो. यांचं असंच झालंय.

तात्पर्य – आपली कारकीर्द केवढुशी… त्यात एक दिवसीय सामन्यात, तुमच्या देशातल्या कोणत्याही बॅट्समनपेक्षा सरासरी जास्त ( Odi Average 62.1 ) असलेल्या शुभमन गिलला… ज्याच्याविषयी अफवा सुद्धा मोठ्या माणसाच्या मुलीबाबत उठतात… अशा माणसाला कधीही उगाच बोलू नये!!

जुने जाणते सांगतात त्याप्रमाणे.. आपली उंची, पगार… ताकद बघून शहाणपणा करावा!!

त्याने टाकलेला चेंडू चांगला होता पण, ‘बॉल ऑफ द टूर्नामेंट’ वगैरे म्हणजे पुन्हा एकदा कॉमेंट्रीमध्ये गेंदा भैय्या भावनेत वाहून जाण्याचा प्रकार… असे बॉल… रवी अश्विन प्रत्येक मॅचमध्ये टाकायचा आणि वरुण चक्रवर्ती वारंवार टाकतो. तेव्हा उगाचच जास्त शहाणपणा नसावा.

तर बालमित्रांनो, छोटी कामगिरी केलीत आणि नीट वागलात तर कौतुक होईल, शहाणपणा केला तर चुलबूल पांडे मान मोडेल.

ता.क. – रशीद खान, नूर अहमद, नबी वगैरे अफगाण स्पिनर्स याहून खूप भारी आहेत पण ते असला माज करत नाहीत.
ता.क. २ – बच्चा भैय्या, गेंदा, चुलबूल वगैरे नावं स्क्रिप्टमध्ये सुचणाऱ्यांना.. वरचा “सा” द्यायलाच हवा.


  

सलील कुलकर्णी यांची पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे. त्याच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.

Web Title: Saleel Kulkarni Slams Pakistani Player Abrar Ahmed Shares Post For Controversial Send-off To Shubman Gill In India Vs Pakistan Match In Icc Champions Trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.