Ved Lavlay Marathi song : वेड लावलंय...! भाईजान अन् रितेश भाऊचा स्वॅग अन् धम्माल डान्स, ‘वेड’चं तिसरं गाणं रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 11:02 IST2022-12-21T10:59:04+5:302022-12-21T11:02:33+5:30
Ved Lavlay Marathi song : ‘वेड लावलंय’ या गाण्यातील सलमान आणि रितेशची केमिस्ट्री सध्या प्रेक्षकांना वेड लावत आहे. या गाण्यानं सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला आहे...

Ved Lavlay Marathi song : वेड लावलंय...! भाईजान अन् रितेश भाऊचा स्वॅग अन् धम्माल डान्स, ‘वेड’चं तिसरं गाणं रिलीज
Salman Khan, Riteish Deshmukh Ved Lavlay Marathi song : रितेश देखमुख आणि जिनिलीया देशमुख यांची मुख्य भूमिका असलेला ‘वेड’ ( Ved ) हा मराठी सिनेमा येत्या 30 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाकडे चाहते डोळे लावून बसले आहेत. भाऊ-वहिनींचा हा सिनेमा कधी एकदा रिलीज होतो, असं चाहत्यांना झालंय. तूर्तास ‘वेड’चं वेड लावणारं गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात रितेश आहे आणि सोबत भाईजान सलमानही आहे. होय, रितेश आणि भाईजान या गाण्यात धम्माल डान्स करताना दिसत आहेत.
‘वेड’ची ‘वेड तुझा’ आणि ‘बेसुरी’ ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली. आता या सिनेमातील तिसरं गाणं ‘वेड लावलंय’ हे गाणं रिलीज झालं आहे. अजय-अतुल या गाजलेल्या जोडीनं ‘वेड’ सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली आहेत.
‘वेड लावलंय’ हे गाणं अजय गोगावणे आणि प्रसिद्ध गायक विशाल ददलानी यांनी गायलं आहे. या गाण्यातील सलमान आणि रितेशची केमिस्ट्री सध्या प्रेक्षकांना वेड लावत आहे. गाण्यात सलमानचा स्वॅग लक्ष वेधून घेतोय. रितेश आणि सलमानची जुगलबंदी प्रेक्षकांना भावणारी आहे. या गाण्यानं सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला आहे.
‘वेड’ या चित्रपटाद्वारे रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. शिवाय त्याची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख हीदेखील या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवतेय. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानची खास झलकही यात पाहायला मिळणार आहे.
यापूर्वी 17 डिसेंबर रोजी रितेशच्या वाढदिवशी सलमानने या गाण्याचा टिझर त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला होता. भाऊचा बर्थडे आहे, गिफ्ट तो बनता है.. असे हटके कॅप्शन सलमानने व्हिडिओ दिलं होतं. 19 डिसेंबरला रितेशने याच गाण्याचा टिझर शेअर करत ‘भाऊ सोबत केलेला वेडेपणा घेऊन येतोय उद्या’ असं सोशल मीडियावरुन चाहत्यांना सांगितलं होतं.
‘वेड’ चित्रपटात रितेशसह जिनिलीया देशमुख, अशोक सराफ, जिया शंकर, विद्याधर जोशी यांच्या महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात आहेत.