समीर धर्माधिकारी ह्या चित्रपटात साकारणार डॉन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 06:00 AM2018-11-16T06:00:00+5:302018-11-16T06:00:00+5:30
अभिनेता समीर धर्माधिकारीचा रावडी लूक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
अभिनेता समीर धर्माधिकारीने आपल्या देखण्या व्यक्तिमत्वासोबतच आपल्या विविधांगी भूमिकांनी आजवर आपली वेगळी छाप उमटवली आहे. 'तू तिथे असावे' या आगामी मराठी चित्रपटात समीर यांचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. बाबा भाई या डॉनची भूमिका समीरने चित्रपटात साकारली आहे. यात समीर धर्माधिकारीचा रावडी लूक पहायला मिळतो आहे. जी कुमार पाटील एंटरटेण्मेंटची प्रस्तुती असलेल्या 'तू तिथे असावे' हा चित्रपट येत्या ७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.
समीरने खूप मेहनत घेतली असून या भूमिकेबद्दल बोलताना समीर म्हणाले की,'यात मी साकारलेला डॉन हा चांगल्याशी चांगला तर वाईटाशी वाईट असा आहे. ग्रे शेड असलेली भूमिका साकारताना मेकअप, बॉडी लँग्वेज, फेशियल एक्स्प्रेशन्स या सगळ्यांकडे खास लक्ष द्यावे लागते. भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात. एकाच इमेजमध्ये अडकून पडायचे नसल्याने ही वेगळी भूमिका स्वीकारली.'
तू तिथे असावे या चित्रपटात समीर यांच्यासोबत भूषण प्रधान, पल्लवी पाटील, मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, मास्टर तेजस पाटील, श्रीकांत वट्टमवार, अभिलाषा पाटील, विशाखा घुबे हे कलाकार आहेत. तू तिथे असावे या चित्रपटाचे निर्माते गणेश पाटील व दिग्दर्शक संतोष गायकवाड आहेत. आकाश कांडुरवार, शरद अनिल शर्मा, प्रशांतजी ढोमणे, सुरभी बुजाडे हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि पटकथा आशिष विरकर यांनी लिहिली आहे. संवाद आशिष विरकर आणि दिपक अंगेवार यांचे आहेत. मंदार चोळकर, डॉ.श्रीकृष्ण राऊत, पार्वस जाधव या गीतकारांनी लिहिलेल्या गीतांना दिनेश अर्जुना यांचे संगीत लाभले आहे. छायांकन बाशालाल सय्यद यांचे असून संकलन मन्सूर आझमी यांचे आहे. कलादिग्दर्शन महेंद्र राऊत आणि गजानन फुलारी यांचे आहे. रोहितोष सरदारे कार्यकारी निर्माते आहेत. येत्या ७ डिसेंबरला ‘तू तिथे असावे’ प्रदर्शित होणार आहे.