समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरने शेअर केला Video, म्हणाली, " कलियुग..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 04:19 PM2023-05-23T16:19:01+5:302023-05-23T16:20:22+5:30

पती अडचणीत आहे म्हणल्यावर ती सोशल मीडियावरुन काही सूचक व्हिडिओ पोस्ट केलाय.

Sameer Wankhede wife kranti redkar shared video narrating story of kaliyug | समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरने शेअर केला Video, म्हणाली, " कलियुग..."

समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरने शेअर केला Video, म्हणाली, " कलियुग..."

googlenewsNext

आर्यन खान ड्र्स प्रकरणी एनसीबीचे(NCB) माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) अडचणीत आले आहेत. आर्यन खानच्या सुटकेसाठी त्यांनी शाहरुख खानकडून खंडणी मागितली असा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी सीबीआय त्यांची चौकशीही करत आहे. दरम्यान समीर वानखेडे यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री, दिग्दर्शिका क्रांती रेडकर (Kranti Redkar) ही पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. क्रांतीने काही वेळापूर्वीच 'कलियुग'ची माहिती देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

क्रांती रेडकरसोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असते. पती अडचणीत आहे म्हणल्यावर ती सोशल मीडियावरुन काही सूचक व्हिडिओ पोस्ट केलाय. नुकताच तिने 'कलियुग'ची गोष्ट सांगत व्हिडिओ पोस्ट केला. ती म्हणते, "माझ्या आज्जीने मला एक गोष्ट सांगितली होती. कलियुगाची गोष्ट. ती म्हणायची हे कलियुग आहे.. यामध्ये खोटं, धोका, दिखावा, छळ कपट आहे. इथे सत्याला लोक टिकू देत नाहीत. जे लोकं खरं काम करतात त्यांच्यावर दबाव टाकण्याची संख्या जास्त आहे. पण असं चांगलं आणि खरं काम करणाऱ्या लोकांना दबाव टाकून त्यांना त्रास देऊन त्यांना जेव्हा तोडलं जाईल तेव्हा पापाचा घडा भरेल. ज्या दिवशी हे वाईट लोक पापाचा घडा भरतील तेव्हा महादेवाला स्वत: या धरतीवर यावं लागेल आणि ते प्रलय करतील."

ती पुढे म्हणाली, "शिवजी प्रलय करणारच होते तितक्यात तिथे श्रीराम आले. ते म्हणतात शिवजी तुम्ही प्रलय केलात तर हे मोजके जे चांगले लोक राहिले आहेत ज्यांच्या चांगुलपणामुळे जग चालत आहे ते सुद्धा संपतील. सांगण्याचं तात्पर्य हे की आपण काय करायचं तर जे चांगले लोक आहेत त्यांना आपण साथ द्यायची आहे. मी चांगल्या मार्गावर चालत आहे तुम्ही आहात का?"

Web Title: Sameer Wankhede wife kranti redkar shared video narrating story of kaliyug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.