'कृतांत' सिनेमाचे पोस्टर आले समोर,संदीप कुलकर्णी दिसणार हटके भूमिकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 03:34 PM2018-07-02T15:34:10+5:302018-07-02T15:37:45+5:30
आजच्या धकाकीच्या जीवनाशी अचानक जुळून आलेला तात्त्विकतेचा संबंध 'कृतांत' या सिनेमाच्या माध्यमातून रसिकांना अनुभवता येणार आहे.
संदीप कुलकर्णी यांनी आजवर साकारलेल्या विविध भूमिकांमधून रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक सिनेमा आणि मालिकांची रसिकांना उत्कंठा असते.श्वास, डोंबिवली फास्ट, गैर, लेडीस स्पेशल, सानेगुरुजी, दुनियादारी यासारख्या विविध मराठी सिनेमात आणि टॅफिक सिग्नल, हजारो ख्वाईशे ऐसी, इस रात की सुबह नहीं अशा विविध हिंदी सिनेमा तसंच छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयानं छाप पाडली आहे. आता कृतांत सिनेमातून संदिप कुलकर्णी रसिकांच्या भेटीला येणार आहेत.‘रेनरोज फिल्म्स’च्या बॅनरखाली मिहीर शाह यांची निर्मिती असलेल्या कृतांत या सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.या सिनेमात संदीप कुलकर्णी साकारत असलेली ही भूमिका त्यांनी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा थोडी हटके असणार आहे.या सिनेमात संदीप कुलकर्णी यांनी सदैव निसर्गाच्या सानिध्यात राहणारा आणि निसर्गप्रेमी ही व्यक्तीरेखा साकारली आहे.संदीप कुलकर्णी यांच्यासोबत सुयोग गो-हे, विद्या करंजीकर, सायली पाटील, वैष्णवी पटवर्धन या कलाकारांच्याही कृतांतमध्ये भूमिका आहेत. आजच्या धकाकीच्या जीवनाशी अचानक जुळून आलेला तात्त्विकतेचा संबंध या सिनेमाच्या माध्यमातून रसिकांना अनुभवता येणार आहे.
सिनेमा हे माझं आवडतं माध्यम आहे. कारण ते सर्वाधिक रसिकांपर्यंत पोहोचतं. तेच नाटकाच्या बाबतीत सांगू शकत नाही. कारण नाटकाचा एक विशिष्ट रसिकवर्ग असतो. तेच रसिक नाटक पाहण्यासाठी येतात; मात्र सिनेमा आणि मालिकांचं तसं नाही. या दोन्ही माध्यमांमधून अगदी शेवटच्या स्तरापर्यंतच्या रसिकांपर्यंत पोहोचता येतं असे लोकमतला दिलेल्या मुलाखतीत संदिप कुलर्णीने आपले मत व्यक्त केले होते.तसेत 'डोंबिवली रिटर्न’ नावाचा नवा सिनेमा येतो आहे. हा सिक्वेल नसून हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत हा सिनेमा असेल. डोंबिवली फास्ट या सिनेमाप्रमाणेच या सिनेमाची कथाही डोंबिवलीतल्या एका कॉमन माणसाची असून, ती डोंबिवलीतच घडते. विशेष म्हणजे, यात गाणी आहेत आणि ही गाणी या सिनेमाच्या कथेला अनुसरून आहेत. हा सिनेमा पूर्णपणे तयार झाला असूनही प्रदर्शनाता मुहुर्त मात्र या सिनेमाला मिळत नाही त्यामुळे सिनेमा प्रदर्शनाची तारिख लांबणीवरच असल्याचे समजतंय.