"श्वास'नंतर संदीप सावंत दिग्दर्शित 'नदी वाहते' रसिकांच्या भेटीला!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2017 07:11 AM2017-07-17T07:11:46+5:302017-07-17T12:41:46+5:30

काही सिनेमा त्यांच्या हटके कथेमुळे प्रदर्शनापूर्वीच रसिकांमध्ये उत्सुकतेचा विषय ठरतात. त्यामुळे रसिकांनाही आशघन सिनेमा पाहण्याची ओढ लागते. त्यापैकीच एक ...

Sandeep Sawant directed by 'River' | "श्वास'नंतर संदीप सावंत दिग्दर्शित 'नदी वाहते' रसिकांच्या भेटीला!

"श्वास'नंतर संदीप सावंत दिग्दर्शित 'नदी वाहते' रसिकांच्या भेटीला!

googlenewsNext
ही सिनेमा त्यांच्या हटके कथेमुळे प्रदर्शनापूर्वीच रसिकांमध्ये उत्सुकतेचा विषय ठरतात. त्यामुळे रसिकांनाही आशघन सिनेमा पाहण्याची ओढ लागते. त्यापैकीच एक नदी वाहते हा सिनेमा लवकरत रसिकांच्या भेटीला येणार आहे.मराठी चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा बदलणाऱ्या श्वास या चित्रपटानंतर दिग्दर्शक संदीप सावंत यांचा हा सिनेमा असून संदीप सावंत यांचा "श्वास"नंतर तब्बल बारा वर्षांनी  'नदी वाहते' हा नवा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे.आताच्या काळात आपल्या गावातली नदी जगवणं, ती वाहती ठेवणं हे मोठं आव्हान आहे. नदीसाठी केवळ मोर्चे काढून, आंदोलनं करून भागणार नाही. तर, नदीचा योग्य पद्धतीनं वापर करणं ही काळाची गरज आहे, या आशयसूत्रावर 'नदी वाहते' बेतला आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि झी गौरव पुरस्कारांत या चित्रपटाला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. संदीप सावंत आणि नीरजा पटवर्धन यांनी सहज फिल्म्स या निर्मिती संस्थेच्या या चित्रपटाची निर्मिती केली आहे. संजय मेमाणे यांनी छायांकन, नीरज व्होरालिया यांनी संकलन,कलादिग्दर्शन,वेशभूषा नीरजा पटवर्धन यांनी केलं आहे. 'श्वास'नंतर माझ्या मनासारखा चित्रपट करण्यासाठी आर्थिक अडचणी होत्या. 'नदी वाहते' हा चित्रपट करण्यासाठी बराच काळ आर्थिक तजवीज करण्यात गेला. त्याशिवाय नदीवरचा चित्रपट करताना, त्यात संशोधनाचा भाग मोठा होता. पूर्ण अभ्यास करून हा चित्रपट केला आहे. नदी, पर्यावरण व शाश्वत विकास या विषयातील तज्ञ, यात काम करणारे अशा अनेकांच्या सहभागातून हा चित्रपट उभा राह्यला आहे.एक महत्वाचा विषय या निमित्तानं हाताळला गेला आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणताना खूप आनंद होत आहे,' असं संदीप सावंत यांनी सांगितलं.


Web Title: Sandeep Sawant directed by 'River'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.