ऐन रिलीजच्या वेळी 'संघर्षयोद्धा'वर सेन्सॉरची कात्री; मनोज जरांगे पाटील म्हणतात, "जाणूनबुजून अडवण्याचा जर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 02:06 PM2024-04-22T14:06:33+5:302024-04-22T14:10:05+5:30

मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारीत 'संघर्षयोद्धा' सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलंय. याविषयी मनोज जरांगे पाटलांनी मौन सोडलंय. काय म्हणाले बघा (manoj jarange patil)

Sangharshyoddha movie was blocked by the censor board Manoj Jarange Patil reaction viral | ऐन रिलीजच्या वेळी 'संघर्षयोद्धा'वर सेन्सॉरची कात्री; मनोज जरांगे पाटील म्हणतात, "जाणूनबुजून अडवण्याचा जर..."

ऐन रिलीजच्या वेळी 'संघर्षयोद्धा'वर सेन्सॉरची कात्री; मनोज जरांगे पाटील म्हणतात, "जाणूनबुजून अडवण्याचा जर..."

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आपलं घरदार पणाला लावलं ह्याच मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आता 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' हा चित्रपट येतोय. हा चित्रपट गेले ४ ते ५ महिन्यापासून राज्यभर चर्चेत आहे. हा चित्रपट २६ एप्रिल २०२४  ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार होता. पण ऐन रिलीजच्या वेळी हा चित्रपट सेन्सॉर बोर्डने प्रदर्शनासाठी थांबवला आहे असं चित्रपटाचे लेखक , निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी सांगितले आहे.

 

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, आपला "संघर्षयोद्धा" चित्रपट जरी सेन्सॉर बोर्डने थांबवला असला, तरी २१ जून २०२४ या नव्या तारखेला मी चॅलेंज देऊन सांगतो की  सगळा समाज, सगळा महाराष्ट्र हा चित्रपट बघेल ,त्याच बरोबर माझ्या ह्या चित्रपटाला शुभेच्छा आहेतच.‘संघर्षयोद्धा’ चित्रपट जाणून बुजून अडवण्याचा जर कोणी प्रयत्न करत असाल तर गाठ माझ्याशी आहे असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. मी लवकरच माझ्या वेळेनुसार  पत्रकार परिषद घेऊन देखील चित्रपटाविषयी बोलेल त्याचबरोबर माझ्या ८ जून रोजी होणाऱ्या ९००  एकर सभेत देखील आपल्या २१ जून २०२४ला प्रदर्शित होणाऱ्या "संघर्षयोद्धा" या चित्रपटाविषयी प्रमोशन करा असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी आवर्जून नमूद केले.

चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्याचं कारण?

सध्या देशात चाललेली आचारसंहिता, मतदान या गोष्टीमुळे निवडणूक आयोगाने सेन्सॉर बोर्डला दिलेले नियम पाहून हा चित्रपट आचारसंहितेमध्ये प्रदर्शित करता येणार नाही असं सेन्सॉर बोर्डाने सांगून हा चित्रपट प्रदर्शनासाठी काही दिवसांकरिता थांबवला आहे. चित्रपटाच्या टीमने अतिशय कष्ट करून सर्वांनी दिवसरात्र काम करून हा चित्रपट बनवला आहे , आता ऐन प्रदर्शनाच्या तोंडावर आमचा चित्रपट थांबवला ह्याचं दुःख होत आहे , पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टित सुपरहिट चित्रपट होणार असं चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका करणारे अभिनेते रोहन पाटील यांनी सांगितले आहे. हा चित्रपट प्रदर्शनापासून थांबवल्यामुळे राज्यभर तीव्र निषेध होतोय. हा चित्रपट आता येत्या २१ जून २०२४ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल.

Web Title: Sangharshyoddha movie was blocked by the censor board Manoj Jarange Patil reaction viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.