संजय जाधव देणार व्हॅलेंटाईन वीकला 'हे' सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 08:00 AM2018-12-29T08:00:00+5:302018-12-29T08:00:00+5:30

दुनियादारी, तू हि रे, प्यारवाली लव्हस्टोरी, गुरू, येरेयेरे पैसा अशा सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन केलेल्या संजय जाधव ह्यांच्या लकी सिनेमातून साऊथ सिनेमा गाजवलेली अभिनेत्री दिप्ती सती डेब्यू करत आहे

sanjay jadhav lucky movie release on 7th february 2019 | संजय जाधव देणार व्हॅलेंटाईन वीकला 'हे' सरप्राईज

संजय जाधव देणार व्हॅलेंटाईन वीकला 'हे' सरप्राईज

googlenewsNext
ठळक मुद्देअभय महाजन आणि दिप्ती सती सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत दिसतील हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

फिल्ममेकर संजय जाधवने  सोशल मीडियावरून आपल्या 'लकी' ह्या नव्या चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेची घोषणा केली आहे. 'बी लाइव्ह प्रोडक्शन्स' आणि 'ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन' निर्मित संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला 'लकी' सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 ला रिलीज होणार आहे. एम एस धोनी आणि फ्लाइंग जाट सारख्या हिट सिनेमाची निर्मिती करणारे बी लाइव्ह प्रोडक्शन्सचे सुरज सिंग 'लकी' सिनेमाव्दारे मराठी सिनेसृष्टीत निर्माते म्हणून पाऊल ठेवत आहे. 

दुनियादारी, तू हि रे, प्यारवाली लव्हस्टोरी, गुरू, येरेयेरे पैसा अशा सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन केलेल्या संजय जाधवच्या 'लकी' सिनेमातून साऊथ सिनेमा गाजवलेली अभिनेत्री दिप्ती सती डेब्यू करत आहे. अभय महाजन आणि दिप्ती सती सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत दिसतील.

 संजय जाधव म्हणतो, “ व्हॅलेंटाईन्सच्या महिन्यात रिलीज होणारा आमचा रोमँटिक-कॉमेडी सिनेमा तरूणाईला खूप आवडेल, असा आमचा विश्वास आहे. तुमच्या संपूर्ण कुटूंबासोबत तुम्ही हा सिनेमा पाहू शकाल आणि तुमचं दोन तास भरपूर मनोरंजन होईल, ह्याची मला शाश्वती आहे.”

'बी लाइव्ह प्रोडक्शन्स' आणि 'ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन' निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 ला सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.   

Web Title: sanjay jadhav lucky movie release on 7th february 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.