अमेय वाघ ठरला ‘लकी’, या दिग्गज दिग्दर्शकाच्या मल्टिस्टारर सिनेमात झळकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 02:50 PM2018-09-05T14:50:43+5:302018-09-05T14:53:49+5:30
यावर्षी जून महिन्यात संजय जाधव यांनी या सिनेमाचे पोस्टर लॉन्च केले होते. तसंच हा सिनेमा डिसेंबर २०१८मध्ये रसिकांच्या भेटीला येईल असेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र सिनेमाच्या स्टारकास्टबाबत त्यांनी काहीही सांगितलं नव्हतं.
मराठी सिनेमा, छोटा पडदा, रंगभूमी, वेबसिरीज अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता म्हणजे अमेय वाघ. आपल्या अभिनयाने अमेयने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. आता रसिकांचा हा लाडका फास्टर फेम अभिनेता दिग्दर्शक संजय जाधव यांच्या आगामी सिनेमात झळकणार आहे. नुकतंच अमेयने 'लकी' या संजय जाधव यांच्या आगामी सिनेमात झळकणार असल्याचे जाहीर केले आहे. 'लकी' या सिनेमात मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार मंडळी झळकणार आहेत. यांत उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, श्रेया बुगडे आणि सोनाली खरे यांचा समावेश आहे. 'लकी' सिनेमाच्या या तगड्या स्टारकास्टमध्ये अमेयचाही समावेश झाला आहे. यावर्षी जून महिन्यात संजय जाधव यांनी या सिनेमाचे पोस्टर लॉन्च केले होते. तसंच हा सिनेमा डिसेंबर २०१८मध्ये रसिकांच्या भेटीला येईल असेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र सिनेमाच्या स्टारकास्टबाबत त्यांनी काहीही सांगितलं नव्हतं. सिनेमाचे शुटिंग पूर्ण झाल्यावर याबाबत माहिती देऊ असं त्यांनी म्हटलं होते.
मल्टिस्टारर सिनेमा आणि संजय जाधव यांचं जुनं नातं आहे. त्यांच्या आजवरील मल्टिस्टारर सिनेमांना रसिकांनी डोक्यावर घेतलं आहे. त्यामुळे अमेयनंतर 'लकी' सिनेमातील आणखी काही कलाकारांची नावं समोर आल्यास आश्चर्य वाटायला नको. अमेयने फास्टर फेणे, मुरांबा या सिनेमातून रसिकांची मनं जिंकलीत. त्यामुळे त्याच्या लकी सिनेमातील भूमिकेबाबत रसिकांना नक्कीच उत्सुकता असेल.
केरळच्या मदतीसाठी अाता कलाकारांचा 'प्रयाेग'!
'अमर फाेटाे स्टुडिअाे' या नाटकाचे मुंबईत हाेणाऱ्या दाेन नाटकांचा नफा हा पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री मदतनिधी मध्ये देण्यात येणार अाहे. अमर फाेटाे स्टुडिअाे हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजत अाहे. तरुण कलाकारांची फाैज असलेल्या या नाटकाने नुकताच 250 प्रयाेगांचा टप्पा देखील पार केला अाहे. या 250 व्या प्रयाेगाच्या दिवशीच मुंबईतील प्रयाेगांचा नफा केरळ पुरग्रस्तांसाठी देणार असल्याचे नाटकाच्या टीमकडून जाहीर करण्यात अाले. याविषयी बाेलताना अमेय वाघ म्हणाला, अामच्या नाटकाचे निर्माते सुनिल बर्वे यांच्या डाेक्यात ही कल्पना सर्वप्रथम अाली. अाम्ही सर्वांनीच लगेच याला हाेकार दिला. केरळच्या पुरग्रस्तांसाठी काहीतरी केलं पाहिजे हे अाम्हा सर्वांनाच वाटत हाेते. सुनिल बर्वेंबराेबरच मी, सुव्रत जाेशी, सखी गाेखले अाम्ही सुद्धा या नाटकाचे सहनिर्माते अाहाेत. अाम्ही सर्वजण कलाकार असल्याने कलेच्या माध्यमातून अापण केरळ पुरग्रस्तांना करुयात असे अाम्ही ठरवले. त्यामुळे मुंबईतील दाेन प्रयाेगांचा नफा हा अाम्ही केरळ पुरग्रस्तांना मदत म्हणून देणार अाहाेत.