दिग्दर्शक संजय जाधवचा 'ये रे ये रे पैसा' सिनेमाला तिस-या आठवड्यातही रसिकांचा प्रचंड प्रतिसाद!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 05:33 AM2018-01-20T05:33:43+5:302018-01-20T12:17:45+5:30

गुलाबजाम पाकात चांगला वाटतो, ताकत नाही....असे काहीसे 'येरे येरे पैसा' चित्रपटातील डायलॉग सध्या कानावर पडत आहेत. नवीन वर्षातील मराठी ...

Sanjay Jadhav's 'Ye Ray Ye Re money' movie is a huge response to the audience in the third week! | दिग्दर्शक संजय जाधवचा 'ये रे ये रे पैसा' सिनेमाला तिस-या आठवड्यातही रसिकांचा प्रचंड प्रतिसाद!

दिग्दर्शक संजय जाधवचा 'ये रे ये रे पैसा' सिनेमाला तिस-या आठवड्यातही रसिकांचा प्रचंड प्रतिसाद!

googlenewsNext
लाबजाम पाकात चांगला वाटतो, ताकत नाही....असे काहीसे 'येरे येरे पैसा' चित्रपटातील डायलॉग सध्या कानावर पडत आहेत. नवीन वर्षातील मराठी चित्रपटांची सुरुवात दमदार झाली आहे. यावर्षी म्हणजे ५ जानेवारीला रिलीज झालेला पहिला मराठी चित्रपट संजय जाधव दिग्दर्शित 'येरे येरे पैसा' ला प्रेक्षकांचा चांगलाच रिस्पॉन्स मिळत आहे. चित्रपटाला सर्वत्र हाऊसफुल्लचे बोर्ड अजूनहि कायम आहेत.चित्रपट प्रदर्शित होऊन २ आठवडे पूर्ण झालेत, आणि मुख्य म्हणजे 'येरे यरे पैसा' तिसऱ्या आठवड्यात देखील थिएटर हाऊसफुल करणार असं दिसतंय. ठाणे, दादर, कांदिवली, वाशी, लालबाग, कल्याण, विरार, कामोठे, उल्हासनगर अशा बऱ्याच शहरांत ये रे ये रे पैसा चे खेळ वाढवले गेलेत.प्रेक्षकांच्या मिळालेल्या उदंड प्रतिसाद मुळे 'येरे येरे पैसा' चे शो वाढवले गेलेत. चित्रपटाबद्दल चाहते सोशल मीडिया वर बोलत आहेत."चित्रपटाचे शो वाढले आणि लोकांना चित्रपट आवडतोय हे पाहून मला फार आनंद झाला आहे, लोकं चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहत आहेत, आणि फक्त चांगला आहे असं न सांगता आम्ही चित्रपट एन्जॉय करत आहोत असं सांगत आहेत", अशा प्रकारे दिग्दर्शक संजय जाधव त्यांचा आनंद व्यक्त करत आहेत.‘येरे येरे पैसा’ ही मुख्यत: तिघांची कथा आहे. तेजस्विनी पंडित,सिद्धार्थ जाधव आणि उमेश कामत ह्यांच्या सोबत संजय नार्वेकर आणि मृणाल कुलकर्णी हदेखील चित्रपटात जोरदार बॅटिंग केली आहे.तिसऱ्या आठवड्यात प्रेक्षक चित्रपटाला जो प्रतिसाद देत आहेत,त्यामुळे संजय जाधव ह्यांच्यासाठी 'ये रे ये रे पैसाचा तिसरा आठवडाही ठरणार असं दिसतंय.

Also Read:​'ये रे ये रे पैसा'या चित्रपटातील एका दृश्यासाठी वापरण्यात आले ६० कॅमेरे

'ये रे ये रे पैसा'या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता पाहायला मिळाली होती.सिनेमाच्या चित्रीकरणात कोणतीही कमतरता पडू नये यासाठी संजय जाधव यांनी एका दृश्यासाठी तब्बल ६० कॅमेरे वापरले होते.चित्रपटाचा विषय हा वास्तवात असलेल्या सगळ्या विषयांपेक्षा वेगळा आहे म्हणजेच कॉमेडी, लव्ह स्टोरी,थ्रिलर या विषयांमध्ये मर्यदित नसून नवीन परिभाषा असलेला हा सिनेमा आहे.




Web Title: Sanjay Jadhav's 'Ye Ray Ye Re money' movie is a huge response to the audience in the third week!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.