"आम्ही सारे खवय्ये इन अमेरिका!" संकर्षणने बनवली भन्नाट रेसिपी; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 10:51 IST2023-09-13T16:54:57+5:302023-09-14T10:51:49+5:30
अमेरिकेत एका मराठी कुटुंबाच्या घरी राहायला आलेला संकर्षण थेट त्यांच्या किचनमध्येच शिरलाय.

"आम्ही सारे खवय्ये इन अमेरिका!" संकर्षणने बनवली भन्नाट रेसिपी; Video व्हायरल
मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) सध्या अमेरिका दौऱ्यावर आहे. त्याच्या 'नियम व अटी लागू' या नाटकाचे प्रयोग सुरु आहेत. महिनाभर नाटकाची टीम संपूर्ण अमेरिकेत प्रवास करणार आहे. परदेशात राहताना कशी स्वत:ची काम स्वत:ला करावी लागतात याचंच उदाहरण संकर्षणने दाखवलंय. अमेरिकेत एका मराठी कुटुंबाच्या घरी राहायला आलेला संकर्षण थेट त्यांच्या किचनमध्येच शिरलाय. बघा संकर्षणने नेमका कोणता पदार्थ बनवलाय.
संकर्षण कऱ्हाडेने मालिका, नाटक आणि सिनेमाच्या चित्रीकरणासोबतच 'आम्ही सारे खवय्ये' या मेजवानीच्या कार्यक्रमाचंही सूत्रसंचालन करतो. दरम्यान अमेरिकेत असताना संकर्षण राजमाने फॅमिलीच्या घरी राहतोय. तिथे त्याने किचनचा ताबा घेतला असून एक रेसिपी बनवली आहे. फोडणीची पोळी आणि फोडणीचा भात असं त्याने एकत्र केलं आहे. हाच त्यांचा नाश्ता आहे. संकर्षण म्हणतो,'आम्ही सारे खवय्ये मध्ये सगळ्यांचं स्वागत...असं म्हणायची सवय झाली आहे. अमेरिकेला आम्ही ज्यांच्या घरी थांबलोय.तिथे नुसतं बसून खाणं बरं वाटत नाही. त्यामुळे त्यांना मी ही खास रेसिपी करुन खाऊ घालणार आहे.'
संकर्षणचा हा व्हिडिओ चाहत्यांना भलताच आवडला आहे. तसंच आम्ही सारे खवय्येची आठवण येत असल्याची प्रतिक्रिया चाहत्यांनी दिलीए. संकर्षणच्या 'नियम व अटी लागू'नाटकात अभिनेत्री अमृता देशमुखही आहे. ती सुद्धा अमेरिकेतील व्हिडिओ, गंमतीजमती पोस्ट करत असते. ३५ दिवस ही टीम अमेरिका दौऱ्यावर आहे.