आलिया, अनन्या इतकीच ग्लॅमरस दिसते ही मराठमोळी अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 15:09 IST2020-02-12T14:38:43+5:302020-02-12T15:09:15+5:30
आपल्या अभिनयाबरोबर आपल्या लूक्समुळे रसिकांची मनं जिंकलेली अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

आलिया, अनन्या इतकीच ग्लॅमरस दिसते ही मराठमोळी अभिनेत्री
आपल्या अभिनयाबरोबर आपल्या लूक्समुळे रसिकांची मनं जिंकलेली अभिनेत्री संस्कृती बालगुडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चर्चेत येण्यास कारणीभूत ठरले आहेत तिचं फोटोशूट. तिच्या या फोटोंमधील अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत. सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारणारी संस्कृती सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. मात्र यावेळी तिने ट्रेडिशनल लूकमधील फोटोशूट करुन सगळ्यांनाचे लक्ष वेधून घेतले आहे. मरुन रंगाच्या ड्रेसमध्ये संस्कृती खूपच सुंदर दिसतेय.
तिचे सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. 'सांगतो ऐका' या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे विविध सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत. आगामी काळात भारंभार सिनेमा स्वीकारायचे नसून सिलेक्टिव्ह राहण्याचा संस्कृतीने निर्धार केला आहे.
'सांगतो ऐका' या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृती बालगुडेचे विविध सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत. संस्कृती शेवटची 'सर्व लाइन व्यस्त आहेत' या चित्रपटात दिसली होती.या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला.