का व्हायरल झालेत संस्कृती बालगुडेचे वधूवेशातील फोटो, संस्कृतीने केले लग्न?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 05:39 PM2021-02-27T17:39:23+5:302021-02-27T17:43:29+5:30
संस्कृतीचे वधूवेशातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे तिने लग्न केले का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
संस्कृती बालगुडेचे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने शेअर केलेल्या काही फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. कारण या फोटोत चक्क संस्कृती वधूच्या वेशात दिसत आहे.
संस्कृतीचे वधूवेशातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे तिने लग्न केले का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. पण संस्कृतीने काही लग्न केलेले नाही तर तिने एका ब्रँडसाठी वेडिंग कलेक्शनचे फोटोशूट केले आहे. त्यामुळे तिचे वधूवेशातील अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळत आहेत.
कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचं कसब अभिनेत्री संस्कृती बालगुडेकडे आहे. तिने आजवर बऱ्याच अवघड भूमिकाही अगदी सोप्या पद्धतीने सादर करीत रसिकांची मनं जिंकली आहेत. अनेक सिनेमे न स्वीकारता सिलेक्टिव्ह राहायला संस्कृतीला आवडते.
संस्कृतीचा 'धरला माझा हात' हा म्युझिक व्हिडीओ अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. संस्कृती बालगुडेच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळते आहे. धरला माझा हातच्या व्हिडीओची निर्मिती व्हिडीओ पॅलेसने केली आहे. 'सांगतो ऐका' या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे विविध सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत.
संस्कृती शेवटची 'सर्व लाइन व्यस्त आहेत' या चित्रपटात दिसली होती. लवकरच ती '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या सिनेमात दिसणार आहे. संस्कृतीसह या सिनेमात अभिनेता शुभंकर तावडे,शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के अशी दमदार स्टारकास्ट आहे. अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. वैभव जोशी यांचे गीतलेखन आणि अवधून गुप्ते संगीत दिग्दर्शन करत आहेत.