'शायद आराम दें आपको मुस्कान हमारी..' संस्कृती बालगुडेच्या फोटोंंवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 18:49 IST2021-12-29T18:45:42+5:302021-12-29T18:49:22+5:30
विविध सिनेमात संस्कृती (Sanskruti Balgude)ने भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत.

'शायद आराम दें आपको मुस्कान हमारी..' संस्कृती बालगुडेच्या फोटोंंवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा
विविध सिनेमात संस्कृती (Sanskruti Balgude)ने भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारणारी संस्कृती सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. वेगवेगळ्या विषयांवर सकारात्मक विचार मांडताना दिसते. सोशल मीडियावर संस्कृतीचे प्रचंड चाहते आहेत.दिवसेंदिवस तिच्या फॉलोअर्सच्या संख्येतही वाढ होत आहे. तिने शेअर केलेल्या काही फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. संस्कृतीने लाल रंगाच्या ड्रेसमधले फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. कितनी ठंड पड़ी है शहर में…शायद आराम दें आपको मुस्कान हमारी…! असं कॅप्शन तिने हे फोटोशूट शेअर करताना दिले आहे. संस्कृतीच्या चाहत्यांनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचं कसब अभिनेत्री संस्कृती बालगुडेकडे आहे. तिने आजवर बऱ्याच अवघड भूमिकाही अगदी सोप्या पद्धतीने सादर करीत रसिकांची मनं जिंकली आहेत. अनेक सिनेमे न स्वीकारता सिलेक्टिव्ह राहायला संस्कृतीला आवडते.
पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.