संस्कृतीचा सिम्पल लूक पाहून पडाल तिच्या प्रेमात, पहा तिचे हे क्युट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 06:51 PM2019-07-25T18:51:28+5:302019-07-25T18:53:22+5:30

अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर सक्रीय असते आणि या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते.

Sanskruti Balgude's simple look, see her photos | संस्कृतीचा सिम्पल लूक पाहून पडाल तिच्या प्रेमात, पहा तिचे हे क्युट फोटो

संस्कृतीचा सिम्पल लूक पाहून पडाल तिच्या प्रेमात, पहा तिचे हे क्युट फोटो

googlenewsNext

अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर सक्रीय असते आणि या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिने पिंक कुर्तीतील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती सिम्पल भलेही दिसत असली तरीदेखील तिचे सौंदर्य लक्ष वेधून घेते. 


संस्कृतीने पिंक रंगाच्या कुर्तीमधील फोटो शेअर करत लिहिले की, माझ्या चेहऱ्यावरील हास्य किंवा हसणे हे फक्त कॅमेऱ्यासाठी दिलेली पोझ आहे आणि तेही कानातल्यांसाठी. 


तसेच तिने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती आणि कोरियोग्राफर आशिष पाटील कलंक चित्रपटातील घर मोरे परदेसियां गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.


 संस्कृती शेवटची 'सर्व लाइन व्यस्त आहेत' या चित्रपटात दिसली होती.या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या सिनेमात संस्कृती व्यतिरिक्त सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, महेश मांजरेकर, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी, राणी अग्रवाल, कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर, हितेश संपत आणि गौरव मोरे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. 


विशेष म्हणजे सुरुवातीला अभिनय क्षेत्रात करियर करण्याबाबत फारशी गंभीर नव्हती. त्याचवेळी अभिनेत्री सुमुखी पेंडसेने संस्कृतीला एक सल्ला दिला.

तिने संस्कृतीला THE DEVILS WEARS PRADA हा हॉलीवुडचा सिनेमा पाहण्याचा सल्ला दिला. त्यानुसार संस्कृतीने हा सिनेमा पाहिला. हा हॉलीवुडचा सिनेमा पाहून आपल्यात बदल घडल्याची कबुली खुद्द संस्कृतीने दिली आहे.

Web Title: Sanskruti Balgude's simple look, see her photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.