"मी बोलणार कारण...", ट्रोलिंगवर संतोष जुवेकरचं भाष्य, अक्षय खन्नाबद्दल म्हणाला-

By देवेंद्र जाधव | Updated: March 11, 2025 19:00 IST2025-03-11T19:00:25+5:302025-03-11T19:00:47+5:30

Santosh Juvekar Clarification on Akshay Khanna: अक्षय खन्नाबद्दल केलेल्या वक्तव्याने संतोष जुवेकरला जे ट्रोलिंग सहन करावं लागलं त्याविषयी त्याने मत मांडलंय.

Santosh Juvekar comment after trolling about Akshaye Khanna statement chhaava movie | "मी बोलणार कारण...", ट्रोलिंगवर संतोष जुवेकरचं भाष्य, अक्षय खन्नाबद्दल म्हणाला-

"मी बोलणार कारण...", ट्रोलिंगवर संतोष जुवेकरचं भाष्य, अक्षय खन्नाबद्दल म्हणाला-

विकी कौशलच्या'छावा' (Chhaava) सिनेमात संतोष जुवेकरने (Santosh Juvekar) रायाजीची भूमिका साकारली. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत "मी अक्षय खन्नाशी बोललो नव्हतो",  असं संतोष म्हणाला. यामुळे त्याला ट्रोल केलं गेलं. अखेर याच मुद्द्यावर फोकस इंडियन या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत संतोषने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. काय म्हणाला संतोष, जाणून घ्या.

ट्रोलिंगवर संतोषचं स्पष्टीकरण

अक्षय खन्नाविषयी केलेल्या वक्तव्यामुळे जे ट्रोलिंग झालं त्याविषयी संतोष म्हणाला की, "माझ्यासाठी अक्षय खन्ना हा तितकाच मोठा अभिनेता आहे. मला ट्रोलिंग झालं म्हणून मी सारवासारव करतोय, असं नाही. लोक अर्धवट ऐकतात. किंवा माझा सांगण्याचा हेतू लोकांपर्यंत चुकीचा गेलाय, असं वाटतंय. अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका केली. अक्षय मुलाखती देत नाही, प्रमोशनला येत नाही, हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. अक्षय खन्नाला गरज नाही हे सर्व करण्याची. तो मोठा अभिनेता आहे. आम्ही स्ट्रगलर आहोत."

"मी किती बोलतो, माझा सिनेमातील रोल किती..; तरी मी बोलणार! छावा चित्रपटाचा भाग असणं ही फार मोठी गोष्ट आहे. फार लोकांना हे भाग्य नाही मिळत. अक्षय खन्नांचा विषय सांगायचा तर, पुरुष नाटकात एका बाईने नाना पाटेकरांना चालू प्रयोगात चप्पल फेकून मारली होती. प्रयोग झाल्यावर नानांनी 'ही चप्पल कोणाची आहे', असं विचारल्यावर ती बाई म्हणाली, 'माझी आहे, मला तुमचा राग आलाय'. नाना म्हणाले, 'धन्यवाद. पण मी चप्पल तुम्हाला देत नाही. कारण हे माझं अॅवॉर्ड आहे'. तो कलाकार इतक्या आत्मियतेने करतोय की त्या बाईला त्याची चिड येते."

"तसंच माझी माझ्या महाराजांबद्दल एक आस्था आहे. छावा पुस्तक वाचून जो इतिहास मला कळालाय त्याचा माझ्यावर प्रभाव आहे. त्यामुळे थोडासा राग येणं साहजिक आहे. मला ट्रोल करणारा कोणीही तिथे असला असता ना, त्यानेही हेच केलं असतं याची मला खात्री आहे. पण याचा अर्थ, अक्षय खन्ना वाईट आहे असं नाही. मी सेटवर गेलो होतो तेव्हा आमचे असिस्टंट 'अक्षय खन्ना सरांना भेटायचंय का?' असं म्हणाले होते. पण त्या गेटअपमध्ये अक्षय सरांना बघून मला त्यांना भेटावंसं नाही वाटलं."

"अक्षय सर को नही मिलना मेरेको, असा माझा अॅटिट्यूड नव्हता. मला ते बघवत नव्हतं. अक्षय खन्नाचा मेकअप, त्याने वापरलेली बॉडी लँग्वेज ती बघून कोणाला चीड येणार नाही? त्यावेळेला माझी प्रामाणिक रिअॅक्शन मी शेअर केली. मला ट्रोल केलंय या गोष्टीला मी पॉझिटिव्हली घेतो. कारण यामुळे मला एक गोष्ट कळली की, अक्षय खन्नावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत. अक्षयजी देखो लोग आपसे कितना प्यार करते है." अशा शब्दांमध्ये संतोषने ट्रोलिंगला उत्तर दिलंय.

 

Web Title: Santosh Juvekar comment after trolling about Akshaye Khanna statement chhaava movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.