"रहमान सरांचं लक्ष नव्हतं तेव्हा विकीने..."; संतोष जुवेकरने सांगितला किस्सा; 'छावा'च्या इव्हेंटला काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 16:26 IST2025-02-13T16:24:35+5:302025-02-13T16:26:12+5:30

'छावा' सिनेमाच्या म्युझिक लाँच सोहळ्यात संतोष जुवेकरने त्याला आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय

santosh juvekar experience with a r rahman on chhaava music launch vicky kaushal | "रहमान सरांचं लक्ष नव्हतं तेव्हा विकीने..."; संतोष जुवेकरने सांगितला किस्सा; 'छावा'च्या इव्हेंटला काय घडलं?

"रहमान सरांचं लक्ष नव्हतं तेव्हा विकीने..."; संतोष जुवेकरने सांगितला किस्सा; 'छावा'च्या इव्हेंटला काय घडलं?

'छावा' सिनेमात (chhaava movie) मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर (santosh juvekar) काम करतोय हे आपल्या सर्वांना माहितच आहे. संतोष गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर 'छावा' विषयीचे अपडेट शेअर करतोय. अशातच संतोष काल 'छावा'च्या संपूर्ण टीमसोबत म्युझिक लाँच सोहळ्यात सहभागी झाला होता. यावेळी संतोषने आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय. 'छावा'चं संगीत देणाऱ्या ए.आर.रहमान, याशिवाय सिनेमात प्रमुख भूमिकेत झळकणारा अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना, दिव्या दत्ता या सर्वांसोबत मराठमोळ्या संतोषला स्टेज शेअर करायला मिळाला. 

संतोषने 'छावा'च्या इव्हेंटचा व्हिडीओ शेअर करुन लिहिलंय की, "काल "छावा" सिनेमाचा म्युझिक लाँच होता. कम्माल... माझ्यासाठी डोळ्याचं पारणं फेडणारा सोहळा झाला, कारणही तसंच होतं. साक्षात संगीत जगतातला आजचा बादशहा ज्याला म्हटलं जातं तो सम्राट ए.आर. रहमान साहेबांना ह्याची देही ह्याची डोळा अगदी पहिल्या रांगेत बसून जिवंत बघण्याची आणि कानभरून ऎकण्याची संधी मिळाली आणि मग कार्यक्रम झाल्यावर सर्व टीमला स्टेजवर बोलवण्यात आलं आणि त्यात चक्क माझं नाव पुकारलं."

"आधी विश्वासच बसत नव्हता मग महेश दादाने पाठीवर जोरात थाप मारत मला उठवलं म्हणाले "अरे जा उठ तूला बोलावलंय" काय घडतंय काही कळत नव्हतं. स्टेजवर गेलो रहमान सरांशिवाय काही दिसतच नव्हतं. सरळ त्यांच्या जवळ गेलो त्यांचं लक्ष नव्हतं तेंव्हा आमच्या विकी भाऊंनी ते ओळखलं आणि त्यांनी मला जवळ घेऊन रेहमान सरांना हाताला धरून वळवून माझी ओळख (तशी त्यांच्या समोर फुटकळचं आहे) करून दिली, विकी भाऊ i love u for this forever.."


"मी रेहमान सरांच्या चरणांना स्पर्श केलाय. त्यांनी माझा हात हातात घेऊन मला शुभेच्छा दिल्यात...... आईईईईई ग!!! सगळ्या कष्टाचं फळ एकदम देवानं पदरात एकाच फटक्यात घालावं आणि तेही असं भरभरून. माझ्यासाठी "छावा" सिनेमा आणि रेहमान सरांसोबत एका स्टेजवर एका फ्रेममध्ये येणं हे केवळ आणि केवळ माझ्या आई बाबांचे देवाचे आणि माझ्या राजांचे आशिर्वाद... आणि आजवरच तुम्हा मायबाप प्रेक्षकांचं प्रेम... लक्ष्मण उतेकर सरांनू खूप खूप प्रेम आणि आदर तुम्ही मला ह्या सिनेमाचा भाग बनवून घेतलंत."

Web Title: santosh juvekar experience with a r rahman on chhaava music launch vicky kaushal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.