ए. आर. रहमान यांच्याबद्दल कमेंट करणाऱ्याला संतोषनं त्याच्याच भाषेत दिलं उत्तर, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 11:04 IST2025-02-18T10:50:18+5:302025-02-18T11:04:33+5:30

संतोष जुवेकर नेटकऱ्याच्या टीकेला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं आहे. 

Santosh Juvekar Gets Trolled After Touching A. R. Rahman Feet At Chhaava Music Launch See What Actor Replied | ए. आर. रहमान यांच्याबद्दल कमेंट करणाऱ्याला संतोषनं त्याच्याच भाषेत दिलं उत्तर, म्हणाला...

ए. आर. रहमान यांच्याबद्दल कमेंट करणाऱ्याला संतोषनं त्याच्याच भाषेत दिलं उत्तर, म्हणाला...

Santosh Juvekar: अभिनेता विकी कौशलचा 'छावा' हा सिनेमा शुक्रवारी १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. सगळीकडे सध्या 'छावा'ची चर्चा आहे. सिनेमाला दिग्गज संगीतकार ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांनी संगीत दिले आहे. या सिनेमात अनेक मराठी कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत. यातीलच एक कलाकार म्हणजे संतोष जुवेकर. अभिनेता संतोष जुवेकरने 'छावा'मध्ये रायाजी ही भूमिका साकारली आहे. त्यांच्या भुमिकेचं प्रचंड कौतुक होत आहे. अलिकडेच म्युझिक लॉन्च सोहळ्यात तो विकी कौशल, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्यासमवेत सहभागी झाला होता. यावेळी संतोषने ए. आर. रहमान यांची भेट घेतली तर त्यांच्या पाया पडत त्यानं आशिर्वादही घेतला होता. यावरुन एका नेटकऱ्यानं त्याला सुनावलं. पण, संतोष जुवेकर नेटकऱ्याच्या टीकेला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं आहे. 

संतोषने  ए. आर. रहमान यांची भेटीचा खास अनुभव इन्स्टाग्राम पोस्टमध्ये व्हिडिओसह शेअर केला होता. त्यानं लिहलं होतं, "काल छावा सिनेमाचं म्युझिक अल्बम लॉन्च होतं. कम्माल... माझ्यासाठी डोळ्याचं पारणं फेडणारा सोहळा झाला. कारणही तसंच होतं. साक्षात संगीत जगतातला आजचा बादशहा ज्याला म्हटलं जातं, तो सम्राट एआर रहमान साहेबांना याची देही याची डोळा अगदी पहिल्या रांगेत बसून जिवंत बघण्याची आणि कानभरून ऐकण्याची संधी मिळाली. कार्यक्रम झाल्यावर सर्व टीमला स्टेजवर बोलवण्यात आलं आणि त्यात चक्क माझं नाव पुकारलं. आधी विश्वासच बसत नव्हता, मग महेश दादाने पाठीवर जोरात थाप मारत मला उठवलं. म्हणाले, "अरे जा उठ तूला बोलावलंय." काय घडतंय काही कळत नव्हतं".

संतोषने पुढे लिहिले की, "स्टेजवर गेलो... रहमान सरांशिवाय काही दिसतच नव्हतं. सरळ त्यांच्या जवळ गेलो, त्यांचं लक्ष नव्हतं. तेव्हा आमच्या विकी भाऊंनी ते ओळखलं आणि त्यांनी मला जवळ घेऊन रहमान सरांना हाताला धरून, वळवून माझी ओळख (तशी त्यांच्या समोर फुटकळचं आहे) करून दिली. विकी भाऊ आय लव्ह यू फॉर धीस फॉरेएव्हर. मी रहमान सरांच्या चरणांना स्पर्श केलाय आणि त्यांनी माझा हात हातात घेऊन मला शुभेच्छा दिल्यात... आईईईईई गं! सगळ्या कष्टाचं फळ देवानं एकाच फटक्यात पदरात घालावं आणि तेही असं भरभरून. माझ्यासाठी छावा सिनेमा आणि रहमान सरांसोबत एका स्टेजवर, एका फ्रेममध्ये येणं हे केवळ आणि केवळ माझ्या आई-बाबांचे, देवाचे आणि माझ्या राजांचे आशीर्वाद आणि आजवरच तुम्हां मायबाप प्रेक्षकांच प्रेम. लक्ष्मण उतेकर सरांनू खूप खूप प्रेम आणि आदर, तुम्ही मला ह्या सिनेमाचा भाग बनवून घेतलंत', असे म्हणत त्याने या पोस्टचा शेवट केला आहे". 


संतोषच्या या पोस्टवर एका व्यक्तीनं कमेंट करत "का इतका कमीपणा?" असा प्रश्न केला. यावर संतोष उत्तर देत म्हणाला, "मित्रा मी स्वतःला star समजण्या पेक्षा ते माझ्या मायबाप प्रेक्षकांनी मला एक कलाकार म्हणून समजणं जास्त महत्वाच वाटतं मला. आणि star होणं हे आपल्या कष्टाने आणि त्या कष्टाला फक्त प्रेक्षक नावच्या देवाच्या आशीर्वाद असावा लागतो". संतोषने दिलेल्या उत्तराने नेटकऱ्यांची बोलती बंद झाली.

Web Title: Santosh Juvekar Gets Trolled After Touching A. R. Rahman Feet At Chhaava Music Launch See What Actor Replied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.