संतोष जुवेकर झळकणार 'कुत्ते' चित्रपटात, म्हणाला - 'खूप स्वप्नं आहेत त्यातलं एक...'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 06:18 PM2022-12-20T18:18:29+5:302022-12-20T18:19:00+5:30

Santosh Juvekar: आता संतोषची स्वप्नपूर्ती करणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Santosh Juvekar will appear in the movie 'Kute', said - 'There are many dreams, one of them is...' | संतोष जुवेकर झळकणार 'कुत्ते' चित्रपटात, म्हणाला - 'खूप स्वप्नं आहेत त्यातलं एक...'

संतोष जुवेकर झळकणार 'कुत्ते' चित्रपटात, म्हणाला - 'खूप स्वप्नं आहेत त्यातलं एक...'

googlenewsNext

अभिनेता संतोष जुवेकरने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या '३६ गुण' या चित्रपटात तो हटके भूमिकेत दिसला होता. त्यानंतर आता संतोषची स्वप्नपूर्ती करणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

संतोष जुवेकर हिंदी चित्रपट कुत्तेमध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याने इंस्टाग्रामवर कुत्ते चित्रपटातील कलाकारांच्या लूकचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, मित्रांनो जानेवारीमध्ये माझा 'कुत्ते' हा हिंदी चित्रपट रिलीज होत आहे. खूप स्वप्नं आहेत त्यातलं एक सत्यात उतरलं आहे. विशाल भारद्वाज यांच्या प्रोडक्शनमध्ये आणि त्यांच्या सिनेमात काम करण्याचं स्वप्न होतं. हे स्वप्न ऑडिशन न देता पूर्ण झालं आहे.


संतोषने पुढे म्हटले की, २०२१ मध्ये कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबरा यांचा कॉल आला, तेव्हा मी त्यांना विचारलं ऑडिशन द्यायला कधी येऊ? यावर ते म्हणाले, विशालसरांनी स्वत: तुझं नाव मेन्शन केलं आहे. मला या कॅरेक्टरसाठी फक्त संतोष जुवेकर हवा असल्याचं विशाल भारद्वाज म्हणाल्याचंही छाबरांनी सांगितलं. अजून काय पाहिजे राव... संतोषच्या या पोस्टवर सेलिब्रिटीजसोबतच रसिकांच्याही प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. 'कुत्ते'मध्ये संतोष जुवेकरसोबत अर्जुन कपूर, तब्बू, नसीरुद्दीन शाह हे कलाकार आहेत.

Web Title: Santosh Juvekar will appear in the movie 'Kute', said - 'There are many dreams, one of them is...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.