संतोष जुवेकर, झाकीर हुसेन, शिल्पा तुळसकर, शर्वरी जमिनेस आणि वैभव मांगलेचा बॉईज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2017 08:08 AM2017-06-08T08:08:51+5:302017-06-08T13:38:51+5:30

'बॉईज'...! या चित्रपटात किशोरवयीन मुलाचे अनेक पैलू मांडण्यात आले आहेत. या चित्रपटात किशोरवयीन मुलांच्या गमतीजमती, त्यांचा प्रत्येक गोष्टींकडे बघण्याचा ...

Santosh Juvekar, Zakir Hussain, Shilpa Tulskar, Shravari Jameenes and Vaibhav Manglecha Boys | संतोष जुवेकर, झाकीर हुसेन, शिल्पा तुळसकर, शर्वरी जमिनेस आणि वैभव मांगलेचा बॉईज

संतोष जुवेकर, झाकीर हुसेन, शिल्पा तुळसकर, शर्वरी जमिनेस आणि वैभव मांगलेचा बॉईज

googlenewsNext
'
;बॉईज'...! या चित्रपटात किशोरवयीन मुलाचे अनेक पैलू मांडण्यात आले आहेत. या चित्रपटात किशोरवयीन मुलांच्या गमतीजमती, त्यांचा प्रत्येक गोष्टींकडे बघण्याचा आयाम या सर्व गोष्टींवर हलकेफुलके भाष्य करण्यात आले आहे. 
'आजोबा' तसेच 'कॉफी आणि बरंच काही' या चित्रपटांच्या यशस्वी निर्मितीनंतर सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे हे निर्माते 'बॉईज' हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. या चित्रपटाचा टिजर, पोस्टर लाँच नुकताच करण्यात आला.
तीन मित्रांचा पाठमोरा लुक असणारा हा टिजर, पोस्टर पाहताना हा सिनेमा संपूर्णपणे युथ इंटरटेनिंग सिनेमा असल्याचे लक्षात येते. तुर्तास या टिजर पोस्टरमधली तीन मुले कोण आहेत हे गुपितच ठेवण्यात आले असून सनी लिओनी या सिनेमातील एका गाण्यात थिरकली आहे. सुनिधी चौहानच्या आवाजातील हे गाणे सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांनी कॉरीओग्राफ केले असल्यामुळे  प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. 
या चित्रपटाची आणखीन एक खासियत म्हणजे, आतापर्यत एकविरा प्रॉडक्शनअंतर्गत सिने-दिग्दर्शक संगीत-दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या भूमिकेत दिसणारे अवधूत गुप्ते आपल्याला ''बॉईज' या सिनेमाद्वारे प्रथमच प्रस्तुतकर्ते म्हणून पाहायला मिळणार आहेत. तसेच अनेक यशस्वी चित्रपटातून सहदिग्दर्शकाची जबाबदारी पेलणारे विशाल देवरुखकर प्रथमच दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटात 'बॉईज'द्वारे पदार्पण करत आहेत. 
या चित्रपटात संतोष जुवेकर, झाकीर हुसेन, शिल्पा तुळसकर, शर्वरी जमिनेस आणि वैभव मांगले या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. घरापासून दूर हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या युवा पिढीची दुनिया यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून, सिनेमाच्या टीजर पोस्टरवरील ही तिकडी लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. 

Web Title: Santosh Juvekar, Zakir Hussain, Shilpa Tulskar, Shravari Jameenes and Vaibhav Manglecha Boys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.