“आता मी या फोटोवरून ट्रोल होणार का?", संतोष जुवेकरच्या फोटोवर खिळल्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 11:57 AM2022-07-22T11:57:43+5:302022-07-22T12:14:43+5:30

फोटोत शर्टलेस होऊन आपली पिळदार बॉडी दाखवत आहे. पिळदार बॉडी कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. त्याच्या चाहत्यांना त्याचा फोटो नक्कीच पसंतीस पात्र ठरला असेल.

Santosh Juvekar's photo Caught Eyeball Of Everyone | “आता मी या फोटोवरून ट्रोल होणार का?", संतोष जुवेकरच्या फोटोवर खिळल्या नजरा

“आता मी या फोटोवरून ट्रोल होणार का?", संतोष जुवेकरच्या फोटोवर खिळल्या नजरा

googlenewsNext

कलाकार अभिनयासह इतर अनेक गोष्टींमध्ये हुशार आणि पारंगत असतात.अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात. काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात. संतोष जुवेकरसुद्धा अभिनयाव्यतिरिक्त वेगेवगेळ्या गोष्टी करताना दिसतो. मुळात तो फिटनेस फ्रिक अभिनेता आहे. तो अनेकदा त्याच्या फिटनेस फंडा चाहत्यांसोबत शेअर करत असतो. फिटनेसबाबत तो प्रचंड सजग आहे. आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही. 

चित्रपट, छोटा पडदा आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाने अभिनेता संतोष जुवेकरने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. दमदार अभिनेता अशी त्याची ओळख निर्माण झाली आहे. कोणतीही भूमिका एकदम परफेक्ट व्हावी यासाठी तो प्रचंड मेहनत घेत असतो.सोशल मीडियावर तो एक्टीव्ह असतो. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे.अनेकदा चाहत्यांशी तो सोशल मीडियावर संवादही साधत असतो. त्याचे फोटो व्हिडीओ तो चाहत्यांसह शेअर करत असतो. 

नुकताच त्याने त्याचा शर्टलेस फोटो चाहत्यांसह शेअर केला आहे. फोटोत शर्टलेस होऊन आपली पिळदार बॉडी दाखवत आहे. पिळदार बॉडी कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. त्याच्या चाहत्यांना त्याचा फोटो नक्कीच पसंतीस पात्र ठरला असेल. मात्र तरीही त्यानं हा फोटो शेअर करत एक प्रामाणिक प्रश्न विचारला आहे. “आता मी या फोटोवरून ट्रोल होणार का? हो किंवा नाहीमध्ये उत्तर द्या.” असं संतोषने म्हटलं आहे.सध्या सोशल मीडियावर त्याच्या या फोटोने आणि कॅप्शननेच सर्वांचेच लक्ष वेधले आहे.तुर्तास त्याने शर्टलेस फोटो शेअर केला असल्यामुळे तो त्याच्या आगामी सिनेमाची तयारी करत असल्याच्याही चर्चा आहेत. 

Web Title: Santosh Juvekar's photo Caught Eyeball Of Everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.