सूर आणि तालाच्या मिलाफाने प्रसन्न झाला आसमंत..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2016 12:48 PM2016-12-11T12:48:10+5:302016-12-11T12:48:10+5:30

सूर आणि तालाच्या सूरमयी मिलाफाने प्रसन्न झालेला आसमंत..रितेश व रजनीश मिश्रा या बंधूंच्या गायनाने भारावून गेलेले रसिक अन देबोप्रिया ...

Saur and Taal were pleased with the presence of Ashamant .. | सूर आणि तालाच्या मिलाफाने प्रसन्न झाला आसमंत..

सूर आणि तालाच्या मिलाफाने प्रसन्न झाला आसमंत..

googlenewsNext
र आणि तालाच्या सूरमयी मिलाफाने प्रसन्न झालेला आसमंत..रितेश व रजनीश मिश्रा या बंधूंच्या गायनाने भारावून गेलेले रसिक अन देबोप्रिया व सुचिस्मिता या भगिनींनी वाजवलेल्या बासरीच्या सुरांनी तृप्त झालेला स्वरमंच..  हृदयाला भिडणारे मंजिरी असनारे यांचे आलाप रसिकप्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत होते.  अशा भारवलेल्या वातावरणात सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दुसर्‍या दिवसाला प्रारंभ झाला. 
सवाई च्या पहिल्या सत्राची सुरूवात बनारस घराण्याचे गायक रितेश व रजनीश मिश्रा यांच्या सुरमधुर गायनाने  झाली. या दोन गानबंधूच्या सूरांनी रसिकांच्या हृदयाच्या तारा छेडल्या आणि श्रोत्यांना परमोचच्च आनंदाची अनुभुती मिळाली.  आपल्या वैशिष्टयपूर्ण गायनशैलीतून त्यांनी मुलतानी रागात गोकुळ गाव के छोरा, ठुमकठुमक चलत जाये आंगण मेनंदलाल या दोन बंदीश खुलवून पेश केली. तसेच तीन ताल तराणा सादर केला. तसेच दृत ताल ही सादर केला. मिश्रा बंधूचा आवाज रसिकांच्या कानावर पडताच रसिकांच्या मूखातून आपसुक वाहवा चा वर्षाव झाला. मिश्रा बंधूंच्या गायनानंतर रसिकांनी त्यांना पुन्हा एकदा गाणे ऐकवण्यासाठी विनंती केली. त्यांनतर त्यांनी साधरे मन सुरको या अतिशय भावार्थ असलेल्या भजनाचे सादरिकरण केले. त्यांच्या मुखातून निघालेल स्वर जणू संपूर्ण श्रोत्यांन एका मंडपात बांधून ठेवत असल्याची अनुभूती होत होती.  मिश्रा बंधूना अरविंद कुमार आझाद(तबला), डॉ. अरविंद थत्ते (हार्मोनिअम), विनय चित्राव व मोसिन मिरजकर (तानपुरा)  साथसंगत केली. 
यानंतर स्वरमंच सज्ज झाला तो बासरीच्या सुरांवर संपूर्ण मैफिलीला स्वर्गाची सफर घडवून आणणारे पंडीत हरिप्रसाद चौरसिया यांच्या शिष्या देबोप्रिया आणि सुचिस्मिता यांच्यासाठी. देबोप्रिया व सुचिस्मिता यांच्या बासरीवर लिलया फिरणार्‍या जादुई बोटांनी रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. या दोन्ही भगिनीनी बासरी वाजवायला सुरूवात करताच रसिकप्रेक्षकांनी ताळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली. त्यांनी मारवा रागाचे सादरिकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. सत्राच्या शेवटी देबोप्रिया व सुचिस्मिता यांनी कानसेनला तृप्त करणार्‍या स्वराची निर्मिती करून श्रोतांनी अंर्तमूख केले. या मंचावर आम्हाला गाण्याची संधी मिळणे हे जणू आमचे भाग्यच आहे. आम्ही दोघी फक्त आमच्या गुरूजनांमुळे व आई वडीलांमुळे इथवर आलो असल्याच्या भावना देबोप्रिया यांनी भावुक होऊन व्यक्त केल्या. पं.रामदास पळसुले (तबला), कांचन लघाटे (तानपुरा) साथसंगत केली. 
सुरेल बासरी वादनानंतर जयपूर - अत्रौली घराण्याच्या गायिका मंजिरी असनारे -केळकर यांनी झंझोटी रागात विलंबीत रूपक तालात स्वतःच्या सुरांना खेळवत महादेव विश्वंभरचे सादरिकरण केले. हे शिव गंगाधर व हर हर शंकर या बंदिशिंनी चे सादरिकरण करून मंजिरी यांनी रसिकांना स्तिमित केलं व खिळवून ठेवलं.  यावेळी उत्पल दत्त(तबला),  सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), देवश्री नवघरे व अमृता मोघल (तानपूरा ) यांनी गायनाला साजेशी साथ दिली. 
मेवाती घराण्याचे बुजुर्ग गायक संगीतमार्तण्ड पंडित जसराज यांच्या गायनाने या दिवसाची सांगता झाली. गेली अनेक वर्ष सवाईत गानसेवा रूजू करणार्‍या जसराज यांचे गाणे ऐकण्यासाठी रसिक अखेरपर्यंत गर्दी करून होते. जसराज यांच्या  गायनाला श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली. 

Web Title: Saur and Taal were pleased with the presence of Ashamant ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.