सौरभ गोखले तलाव या चित्रपटात झळकणार एका वेगळ्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2017 06:49 AM2017-02-06T06:49:04+5:302017-02-06T12:19:04+5:30
राधी ही बावरी या मालिकेमुळे सौरभ गोखले प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. त्याने उंच माझा झोका, अरुंधती यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम ...
र धी ही बावरी या मालिकेमुळे सौरभ गोखले प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. त्याने उंच माझा झोका, अरुंधती यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. तसेच तो योद्धा या चित्रपटात झळकला होता. आता तो तलाव या चित्रपटात प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
तलावाच्या काठाशी फुलणारी एक सुंदर कथा प्रेक्षकांना तलाव या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सिद्धू आणि कादंबरीची प्रेमकथा या चित्रपटात दाखवली जाणार असून सिद्धू हा आपल्या कारकिर्दीत यशस्वी असलेला व्यक्ती आहे तर कादंबरी ही खूप छान लिखाण करते. तिला एक प्रसिद्ध कादंबरीकार बनण्याची इच्छा आहे. या दोघांची आगळीवेगळी प्रेमकथा या चित्रपटात दिग्दर्शक जयभीम कांबळे यांनी अतिशय सुंदररित्या मांडली आहे.
तलाव हा चित्रपट १० मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटात सौरभ गोखलेसह संजय खापरे, नवनीत फोंडके, वर्षा पवार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाद्वारे प्रियांका राऊत हा नवा चेहरा मराठी चित्रपटसृष्टीला मिळणार आहे. प्रियांका सौरभच्या नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटातील अनेक कलाकार हे नवीन आहेत. पण तरीही त्यांनी त्यांच्या भूमिका तितक्याच ताकदीने साकारल्या आहेत. या चित्रपटातील गाणी नंदेश उमप आणि आदर्श शिंदे यांनी त्यांच्या भारदस्त आवाजात गायली आहेत.
संजय खापरेने साकारलेला मुजोर, गर्विष्ठ आणि उन्मत्त धनंजय पाटील आपल्या सभोवताली असणाऱ्या समाज कंटकांची नेमकी प्रतिमा उभी करतो. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना आवडेल अशी त्याला खात्री आहे. आपल्या आयुष्यातून प्रेम निघून गेल्यानंतर निव्वळ नीरसता शिल्लक राहाते. आयुष्यात आलेली हीच तलावासारखी शांतता आणि स्तब्धता या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे.