‘माझ्याकडे देव माझा पाहतो आहे’, सावनी रविंद्रनं आशा भोसलेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 19:52 IST2023-09-08T19:51:06+5:302023-09-08T19:52:25+5:30

प्रसिद्ध गायिका राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रविंद्रने सोशल मीडियाच्या माध्यमातून आशा भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Savani Ravindra wished Asha Bhosle on her birthday | ‘माझ्याकडे देव माझा पाहतो आहे’, सावनी रविंद्रनं आशा भोसलेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Savani Ravindra

बॉलिवूडमध्ये विशिष्ट गाण्यांनी प्रेक्षकांवर छाप पाडणाऱ्या पार्श्वगायिका आशा भोसले आज ९० वा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या अप्रतिम गायनानं तमाम भारतीयांच्या मनावर राज्य करत आल्या आहेत. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी आशा भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसिद्ध गायिका राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रविंद्रने सोशल मीडियाच्या माध्यमातून आशा भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गायिका सावनी रविंद्रने सोशल मीडियावर केली आहे. पोस्टमध्ये लिहलं की, “माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, प्रसिद्ध गायिका आशाताई भोसले तुम्हाला ९० व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा”. सावनीने आशा भोसले यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. 

विविध छटा असलेली अनेक प्रकारची गाणी अजरामर करणाऱ्या श्रीमती आशा भोसले यांचा जन्म 1933 साली झाला.
संगीत आणि नाटकाचा वारसा असलेल्या आशा भोसले यांनी लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. आशा भोसले यांची कारकीर्द सुरू झाली 1943 साली. त्यानंतर 1948 मध्ये त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यांनी बॉलीवूडमध्ये सात दशकं अधिराज्य गाजवलंय.

विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायल्यामुळे 2011 साली आशा भोसले यांचं गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं. आशा भोसले यांनी हिंदी, मराठी, बंगाली, तेलगू, तामिळ, इंग्रजी अशा भाषेत गाणी गायली आहेत. आशा भोसले केवळ गायिका नसून त्या प्रसिद्ध व्यावसायिकदेखील आहे. आशा भोसले यांचं दुबईमध्ये एक रेस्टॉरंट आहे.

Web Title: Savani Ravindra wished Asha Bhosle on her birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.