सावनी रविंद्रचे पहिल तामिळ रेकॉर्ड गाणं होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2016 02:51 PM2016-12-16T14:51:21+5:302016-12-16T15:03:19+5:30

प्रत्येत कलाकाराला पहिला चित्रपट, गाणे, सहकलाकार याविषयी अधिक प्रेम असतं. कारण आपल्या यशस्वी करिअरची सुरूवातच त्या गोष्टींपासून झालेली असते. ...

Savani's first Tamil recording song will be performed | सावनी रविंद्रचे पहिल तामिळ रेकॉर्ड गाणं होणार प्रदर्शित

सावनी रविंद्रचे पहिल तामिळ रेकॉर्ड गाणं होणार प्रदर्शित

googlenewsNext
रत्येत कलाकाराला पहिला चित्रपट, गाणे, सहकलाकार याविषयी अधिक प्रेम असतं. कारण आपल्या यशस्वी करिअरची सुरूवातच त्या गोष्टींपासून झालेली असते. असाच काहीसा आनंद मराठी चित्रपटसृष्ट्रीची गायिका सावनी रविंद्र हिला झाला आहे. तिच्या या आनंदाविषयी लोकमत सीएनएक्सला सावनी सांगते, हो, सध्या मी खूपच आनंदात आहे. कारण माझे तामिळमधील पहिले रेकॉर्ड झालेले गाणे लवकरच प्रदर्शित होणार आहे. हे गाणे माझ्या अगदी जवळचे आहे. या रेकॉर्ड झालेल्या गाण्यानंतर मी गेली वर्षेभर तामिळ इंडस्ट्रीमध्ये खूप गाणी गायली आहेत. दहा गाणी तरी माझी रेकॉर्ड झाली असणार आहे. मात्र पहिल्या गाण्याचा आनंद काही औरच असतो. आजकाल कोणी अल्बम ऐकत नाही म्हणून हे यू टयूब सिंगल गाणे केले आहे. वेन्निलविन सालईगलिल असे या गाण्याचे बोल आहेत. खरं सांगू का, तामिळ भाषेत गाणी गाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. ही भाषा खूप अवघड असते. अजून ही मला ही भाषा बोलत येत नाही. मात्र या भाषेतील गाणी गाताना मी ही गाणी देवनगरी भाषेत लिहिते. मी बीए संस्कृत केल्यामुळे ही गाणी गाण्यास सोपी जातात. यापूर्वी गायिका सावनी रवींद्रने अनेक मराठी चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. सावनीने तिच्या सदाबहार अवाजाने रसिक प्रेक्षकांना देखील नेहमीच मंत्रमुग्ध केले आहे. तसेच छोटया पडदयावरदेखील तिच्या आवाजाची जादू ऐकण्यास मिळाली. कारण तिने होणार सून मी हया घरची, कमला अशा अनेक मालिकांचे शीर्षकगीत सावनीने गायिली आहेत. तसेच नुकतेच तिने सावनी रवींद्र नावाचे एक नवे अ‍ॅपदेखील तिने चाहत्यांसाठी आणले आहेत. या अ‍ॅपच्या माध्यमातून सावनीचे सर्व गाणी तिच्या चाहत्यांना ऐकण्यास मिळत आहेत. 

Web Title: Savani's first Tamil recording song will be performed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.