सावंत सिस्टर्सचा 'नाच गं घुमा'!! पूजा आणि रुचिराच्या दमदार डान्सला मिळतेय पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 13:15 IST2024-05-08T13:15:06+5:302024-05-08T13:15:41+5:30
Nach Ga Ghuma : सध्या सर्वत्र 'नाच गं घुमा' या मराठी सिनेमाची चर्चा आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत असलेला हा चित्रपट १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. घरोघरी काम करणाऱ्या कामवाल्या बाईचे विश्व या सिनेमातून रुपेरी पडद्यावर मांडण्यात आले आहे.

सावंत सिस्टर्सचा 'नाच गं घुमा'!! पूजा आणि रुचिराच्या दमदार डान्सला मिळतेय पसंती
सध्या सर्वत्र 'नाच गं घुमा' (Nach Ga Ghuma) या मराठी सिनेमाची चर्चा आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत असलेला हा चित्रपट १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. घरोघरी काम करणाऱ्या कामवाल्या बाईचे विश्व या सिनेमातून रुपेरी पडद्यावर मांडण्यात आली आहे. ट्रेलरपासूनच या सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. 'नाच गं घुमा' प्रदर्शित होताच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अजूनही या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कायम आहे. दरम्यान आता अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant ) आणि तिची बहीण रुचिरा (Ruchira Sawant) हिने नाच गं घुमा गाण्यावर थिरकून रसिकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.
सध्या सोशल मीडियावर नाच गं घुमा गाण्यावरील रिल पाहायला मिळत आहे. या रिलला खूप पसंती मिळताना दिसत आहे. दरम्यान आता सावंत सिस्टर्स म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत आणि तिची बहीण रुचिराने नाच गं घुमा या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या दोघींनी या गाण्यावर दमदार डान्स केला आहे. त्यांच्या या डान्सला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
पूजाने नाच गं घुमा गाण्यावर थिरकतानाचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ नाच गं घुमा ‘ चित्रपटाच्या संपुर्ण टिमला खुप खुप शुभेच्छा.आम्ही चित्रपट लवकरच बघू , तुम्हीही न चुकता हा चित्रपट नक्की बघा … पूजाच्या या व्हिडीओवर अभिनेत्री नम्रता संभेराव हिने कमेंट केली आहे. तिने लिहिले की, माझी प्रिय, माझी पूजा. रुचिरा या गोड हावभावासाठी तुमचे खूप खूप आभार. लवकर बघा.
सिनेमाबद्दल
'नाच गं घुमा' चित्रपटाचे दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केले आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव,सारंग साठ्ये, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, मायरा वायकुळ यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. तर स्वप्निल जोशी आणि शर्मिष्ठा राऊत यांनी 'नाच गं घुमा' सिनेमाच्या निर्मितीची बाजू सांभाळली आहे.